नाशिक सिंहस्थ कुंभमेळाव्यावरून महायुतीत अंतर्गत कलह

पालकमंत्री पदावरून धुसफूस सुरु : शिंदेंच्या उपस्थितीत बैठक

0

 

लोकशाही न्यूज नेटवर्क

सध्या उत्तर प्रदेश प्रयागराज येथे महाकुंभ मेळा सुरु आहे. त्यानंतर 2027 साली महाराष्ट्रात नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. या कुंभ मेळ्याच्या आयोजनावरुन महायुतीमध्ये वेगवेगळ्या बैठकांच सत्र सुरु आहे. एकप्रकारे महायुतीमधील कोल्ड वॉर यातून समोर आलं आहे. काही दिवसांपूर्वी गिरीश महाजन यांनी कुंभ मेळ्याच्या आयोजनाबाबत एक बैठक घेतली होती. या बैठकीला मंत्री दादा भुसे अनुपस्थित होते. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिंहस्थ कुंभ मेळ्यासंदर्भात बैठक घेणार आहेत. या बैठकीला गिरीश महाजन अनुपस्थित असतील, पण दादा भुसे हजर राहतील. नाशिकच पालकमंत्री पद हे या कोल्डवॉरच्या मुळाशी आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बैठकांच्या निमित्ताने महायुतीमध्ये पालकमंत्री पदावरुन सुरु असलेलं कोल्डवॉर समोर आलं आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बैठकीला पालकमंत्र्यांकडे अध्यक्षस्थान असणं आवश्यक आहे. पण नाशिकच पालकमंत्री पद अजून निश्चित झालेलं नाही. त्यामुळे काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत बैठक बोलवली. एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. ते या ठिकाणी बैठक घेत आहेत. काही दिवसांपूर्वी गिरीश महाजन यांनी वेगळी बैठक बोलवली होती. तिन्ही बैठकांच कारण वेगळ सांगण्यात आलं होतं.

मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये बैठक होणं गरजेच असल्याचं त्यावेळी सांगण्यात आलं. गिरीश महाजन कुंभमेळा मंत्री आहेत, त्यामुळे त्यांनी बैठक घेतल्याच सांगण्यात आलं. आता एमएमआरडीए सारखी महत्त्वाची खाती एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत, त्यामुळे प्रयागराज सारखी दुर्घटना होऊ नये म्हणून आजची बैठका घेण्यात येतेय असं शिवसेनेकडून सांगण्यात येतय. तिन्ही पक्षांकडून वेगवेगळी कारण सांगण्यात आली आहेत. प्रत्यक्षात मात्र नाशिकच्या पालकमंत्री पदावर दोन्ही पक्षांचा दावा सांगण्याचा प्रयत्न आहे.

शिवेसना सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी नाशिकच्या पालकमंत्री पदावर दावा कायम असल्याच सांगितलं. कार्यकर्त्यांची तशी इच्छा असल्याच ते म्हणाले. पालकमंत्री पदाच्या कोल्ड वॉरवरुन अशा पद्धतीच्या बैठका लावल्या जातायत असा संभ्रम अधिकाऱ्यांमध्ये निर्माण झालाय.

Leave A Reply

Your email address will not be published.