Sunday, November 27, 2022

इंटरॅक्ट क्लबतर्फे आनंदाची गुरुकिल्ली यावर व्याख्यान

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

माध्यमिक विद्यालय शारदा कॉलनी (Secondary School Sarada Colony) जळगाव (Jalgaon) येथे दि. २७ सप्टेंबर रोजी रोटरी क्लब (Rotary Club) संचलित इंटरॅक्ट क्लब (Interact Club) अंतर्गत 7/7/7 व्याख्यानमाला प्रकल्प अंतर्गत तिसरे पुष्प गुंफण्यासाठी रोटरी आणि नितीन विसपुते यांचे आनंदाची गुरुकिल्ली या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले.

- Advertisement -

- Advertisement -

कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. एम. गिरनारे यांनी प्रमुख पाहुणे व आजचे व्याख्याते नितीन विसपुते यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच रोटरी समन्वयक संदीप शर्मा यांचे देखील गिरनारे यांनी स्वागत केले. नितीन विसपुते यांनी आनंदाची गुरुकिल्ली या विषयावर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंटरॅक्ट क्लबचे उपाध्यक्ष रोहिणी अलाट यांनी केले तर आभार प्रदर्शन इंटरॅक्ट क्लबचे सदस्य उर्मिला पवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. नितीन विसपुते मनोरंजकपणे व्याख्यानात रंगत आणली. यावेळी मुले आनंदी झाली.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या