Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिल्लीतील इमारत कोसळली; किती विद्यार्थी दबले गेले?
    • यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?
    • भुसावळ राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेत; सावकारे गटात अस्वस्थता!
    • बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!
    • दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली
    • महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा
    • नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»आंतरजिल्हा टोळी गजाआड!
    ताज्या बातम्या

    आंतरजिल्हा टोळी गजाआड!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 5, 2026No Comments188 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    एटीएम कार्ड बदलून लाखोंची फसवणूक : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
    जळगाव – एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या नागरिकांचे लक्ष विचलित करून, हातचलाखीने त्यांचे एटीएम कार्ड बदलून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश करण्यात जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. याप्रकरणी धुळे येथून एका सराईत भामट्याला रंगेहाथ पकडण्यात आले असून, त्याचा मुंबईतील सराईत साथीदार फरार आहे.
    याबाबत असे की, दि. 26 मार्च 2026 रोजी जळगाव शहरातील बेंडाळे चौक परिसरातील एसबीआयच्या एटीएममध्ये एक तक्रारदार नागरिक पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी तेथे आलेल्या एका अनोळखी व्यक्तीने त्यांचे लक्ष विचलित करून अतिशय हातचलाखीने त्यांचे मूळ एटीएम कार्ड बदलून बनावट कार्ड त्यांच्या हाती दिले. त्यानंतर या आरोपीने आणि त्याच्या साथीदाराने त्या मूळ कार्डचा वापर करून धुळे, नंदुरबार आणि मालेगाव येथील विविध एटीएममधून तब्बल 2 लाख 31 हजार रुपये काढून फसवणूक केली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात बीएनएस कलम 318(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना तपासाचे आदेश दिले. गायकवाड यांनी तत्काळ वेगवेगळी पथके तयार करून तपासाला गती दिली. पोलिसांनी घटनास्थळावरील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची अत्यंत बारकाईने पाहणी केली. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या पया माहितीच्या आधारे पोलिसांना आरोपींचे धागेदोरे धुळे येथे मिळाले. धुळे येथे एटीएम सेंटरमध्ये पुन्हा दुसऱ्या नागरिकाला गंडा घालण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी शेख हबीब शेख नवाब (वय 54, रा. लाला सरदार नगर, धुळे) याला शिताफीने ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपीची चौकशी केली असता, या गुन्ह्यात त्याचा दुसरा साथीदार सैय्यद कमालुद्दीन खान (वय 35, रा. साकीनाका, अंधेरी, मुंबई) हा सामील असल्याचे निष्पन्न झाले आहे. तो सध्या फरार आहे. विशेष म्हणजे या फरार आरोपीवर मुंबई आणि नवी मुंबई (कांदिवली, कामोठे, कळंबोली, वाशी, कापूरबावडी इ.) परिसरात फसवणुकीचे 10 हून अधिक गंभीर गुन्हे आधीच दाखल आहेत. जळगाव पोलीस आता त्याचा कसून शोध घेत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला

    September 7, 2026

    यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?

    September 7, 2026

    युवतींच्या दहीहंडीत शिवतीर्थावर नारीशक्तीचा थरार

    September 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif