Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    • हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!
    • दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!
    • फार्मर आयडीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना दिलासा
    • शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»कृषी»गेल्या २४ तासापासून स्वाभिमानीचे तीव्र आंदोलन
    कृषी

    गेल्या २४ तासापासून स्वाभिमानीचे तीव्र आंदोलन

    स्वाभिमानीचे ऊसउत्पादकांचे आंदोलन पेटले : मुंबईला जाणारा भाजीपाला-दूध रोखणार
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveNovember 4, 2026No Comments29 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसाला पहिली उचल प्रतिटन साडेचार हजार रुपये मिळावी, या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आता चांगलीच आक्रमक झाली आहे. राजू शेट्टी यांनी कोल्हापूरमधील किणी टोलनाका रोखून धरला असतानाच त्यांच्या आदेशानुसार साताऱ्यातील नागठाणे येथे पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर जोरदार रास्ता रोको आंदोलन सुरू आहे. गेल्या २२ तासापासून स्वाभिमानीचे तीव्र आंदोलन सुरू आहे. महामार्ग रोखून धरल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. तर काही ट्रक चालकांनी त्यांना मारहाण झाल्याचाही आरोप केला आहे.

    सरकारने साखरेची एमएसपी ५० रुपये करावी आणि इथेनॉलच्या दरात १२ रुपयांची वाढ करून तो ७० रुपये करावा. राज्य सहकारी बँकेने साखरेचे मूल्य प्रति क्विंटल ४ हजार २०० रुपये केले असतानाही सर्वपक्षीय कारखानदार एकजूट करून शेतकऱ्यांना उचल देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष अनिल पवार यांनी केला आहे. जोपर्यंत कोल्हापूरमधील आंदोलनावर तोडगा निघत नाही आणि राजू शेट्टींचा पुढील आदेश येत नाही, तोपर्यंत महामार्गावरून हटणार नाही, असा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.

    पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर नागठाणे गावच्या हद्दीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रस्त्यावर चक्का जाम आंदोलन केल्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. ऊसाला पहिली उचल चार हजार पाचशे रुपये मिळावी ही प्रमुख मागणी सह इतर मागण्या पूर्ण कराव्यात यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलक रस्त्यावर बसलेले पाहायला मिळत आहेत.

    स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस दर आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. गेल्या २२ तासांपासून पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात आला आहे. या महामार्गावरील किनी टोल नाका येथे राजू शेट्टी यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलेले आहे. आजपासून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. आज तोडगा निघाला नाही तर मुंबईकडे जाणारा भाजीपाला आणि दूध रोखण्याचा ही शेट्टी यांनी इशारा दिला आहे.

    अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वेत स्वाभिमानीचा फायनान्स कंपनीला दणका दिला आहे. कांबळे परिवाराच्या घराचे सील तोडले. धामणगाव रेल्वे तालुक्यातील निंबोरा बोडखा येथील घटना आहे. एका फायनान्स कंपनीने कांबळे परिवाराच्या घराला सील ठोकले होते. रवी कांबळे आणि राजकुमार कांबळे यांच्या कुटुंबाचा घरात प्रवेश रोखल्याचा आरोप होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कपिल पडघान यांच्या नेतृत्वात आंदोलन करून हातोडा मारून घराचे सील तोडण्यात आले.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार

    November 8, 2026

    कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ

    November 8, 2026

    हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!

    November 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif