इंस्टाग्राम रिल्स बनवण्यावरून पती-पत्नीत वाद, पत्नीची हत्या

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

कोलकत्ता येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. इंस्टाग्राम रिल्स बनवण्यावरून झालेल्या छोट्या वादातून पतीकडून आपल्याच पत्नीची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबतचा अधिक तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धक्कादायक ही घटना (दि २४) शुक्रवार रोजी हरिनारायणपूर येथे घडली. आरोपी परिमल बैल आणि मयत महिला अपर्णा यांचे १७ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. आरोपी परिमल हा व्यवसायाने गंवडी आहे. या जोडप्याला एक लहान मुलगा आणि एक मुलगी आहे.

पत्नीचे प्रेमसंबंध असल्याचा संशय
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयत महिलेला इंस्टाग्राम रिल्स बनवण्याची सवय होती. तसाच इंस्टाग्राममुले तिचा नवा फ्रेंड सर्कल निर्माण झाला होता. या फ्रेंड सर्कलमध्ये अपर्णाचे अनेक मित्र-मैत्रिणी बनल्या होत्या आणि ती त्यांच्याशी सारखी बोलत असत. विशेष म्हणजे एका मित्राशी ती बोलीली आरोपी पतीस जराही आवड नसे. परिमल याला आपल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय होता. यावरून दोघांमध्ये सारखे वाद होत असे. रोजच्या वादाला कटांळून महिला काही महिन्यांसाठी पतीला सोडून माहेरी राहण्यास गेली.

महिलेचा मुलगा घरी आल्यावर घटना समोर
मयत महिलेचा मुलगा क्लासवरून घरी आल्यावर त्याला आई रक्त्याच्या थारोळ्यात घरात पडलेली. आईला बघून मुलाने आरडा-ओरडा केल्यानंतर शेजाऱ्यांना घटनास्थळी धाव घेत याबद्दलची माहिती जवळील पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिकांशी या कुटुंबियांबद्दल माहिती घेतली. मयत महिलेच्या मुलाची चौकशी करतांना त्याने सांगितले की, माझ्या आई-वडिलांचे सतत भांडणे होत असतं. एवढेच नाही तर गुरूवारीही दोघांमध्ये वाद झाले होते आणि वडिलांनी आईला जीवे मारण्याचीही धमकी दिली होती.

पोलिसांनी घटनास्थळावरून अपर्णाच्या हत्येसाठी वापरण्यात आलेले हत्यार जप्त केले. हत्या केल्यानंतर आरोपी परिमल हा फरार झाला आहे. मयत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळील रूग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत असून फरार परिमलचा शोध सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.