मंत्री गिरीश महाजन यांचेकडून कुंभस्थळाची पाहणी…

0

 

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

तालुक्यातील गोद्री येथे गोरबंजारा, लबाना-नायकडा समाजाचा कुंभमेळा आयोजित करण्यात आला आहे. त्या संदर्भात जय्यत तयारी युद्धपातळीवर सुरु आहे, त्या अनुषंगाने महाकुंभ स्थळाच्या तयारीची पाहणी राज्याचे ग्रामविकास तथा क्रिडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी केली. त्याच बरोबर गोद्री- फत्तेपुर भागातील सुरू असलेल्या विकास कामांचीही माहिती व प्रत्यक्षात संबंधीत ठिकाणी जाऊन पाहणी केली. आणि सोबत असलेल्या सार्वजनीक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना महत्वाच्या सुचना देखील दिल्या आहेत.

यावेळी मंत्री गिरीश महाजनांसोबत जिल्हा परिषदेचे सदस्य अमीत देशमुख, बांधकाम विभागाचे आर डी पाटील, आरोग्यसेवक रामेश्वर नाईक, दिनेश गोडंबे, बबलू भन्साली, रवींद्र चौधरी, युवराज पाटील, उत्तम राठोड, भगवान मंझा, नितू ठाकूर, बद्रीशेठ चौधरी, शिवा गोडंबे, निलेश चव्हाण, अक्षय जाधव, विश्वनाथ चव्हाण, भरत राठोड, प्रवीण राठोड, गबरू नाईक, मुरारसिंग, शांताराम मनजावत, भागचंद साबळेयासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

येत्या २५ जानेवारी ते ३० जानेवारी २०२२ अशा तब्बल सहा दिवस हा ऐतिहासिक महाकुंभ चालणार आहे. सदर कुंभासाठी देशभरातुन अध्यात्मिक गुरू, साधु, संत, महंत शिवाय राजकीय नेतेमंडळी आदींची या गोर बंजारा, लबाना-नाईकडा अखील भारतीय स्तरावरील कुंभामध्ये उपस्थिती राहणार आहे. त्यामुळे तालुक्यात प्रथमच होऊ घातलेल्या या सांस्कृतिक-अध्यात्मिक ठरणाऱ्या सामाजिक उत्सवासाठी (कुंभ) मंत्री गिरीश महाजन हे कुंभाच्या पुर्वतयारीवर जातीने लक्ष ठेवत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.