पपई पिकावर मोझॅक रोगाची लागण : शेतकरी चिंतेत

आधीच पावसाने पिकांचे नुकसान त्यात ही भर..

0

 

लोकशाही न्यूज नेटवर्क

सततच्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे बळीराजा कोणत्या ना कोणत्या संकटात सापडलेला दिसून येतोय. अश्यात आता पिकांवर रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे. काढणीवर आलेल्या पपई पिकावर मोझॅक रोगाची लागण झाली आहे. परिणामी पपई उत्पादक शेतकरी देखील संकटात सापडला आहे.

 

नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पपईची लागवड करण्यात येत असते. खरीप हंगामात दहा हजार हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावर पपईची लागवड करण्यात आली आहे. मात्र पपई पिकावर मोझॅक रोगाच्या प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पपई पीक ऐन काढणीच्या वेळेस पपईवर रोगाच्या प्रादुर्भाव झाला आहे. शेतकऱ्याने मोठ्या कष्टाने जगवले आहेत. यावर्षी पाऊस सोबतच कोणाच्या देखील तडाका वाढत आहे. त्यामुळे निसर्गाशी दोन हात करत शेतकऱ्यांनी आपलं एका जगवले आहेत.

मात्र रोगाच्या पादुर्भावामुळे शेतकरी आता आर्थिक अडचणीत सापडला असून या अडचणीतून मार्ग कसा काढावा असा प्रश्न आता बळीराजा समोर उपस्थित झाला आहे. हीच परिस्थिती पपई उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे. मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पपई पिवळी पडत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.