#INDvWI : रोहित-राहुलची तुफान फटकेबाजी; विंडीजसमोर ३८८ धावांचे लक्ष्य

0

विशाखापट्टणम : रोहित शर्माच्या शानदार दीडशतकी आणि के. एल. राहुलच्या शतकी खेळीनंतर अखेरच्या षटकात श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत यांनी केलेल्या तूफान फटकेबाजीच्या जोरावर भारताने दुस-या एकदिवसीय सामन्यात विंडीज समोर ३८८ धावांचे विशाल लक्ष्य ठेवले आहे.

वेस्टइंडिजने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारुन भारतीय संघास प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं होत. भारताच्या सलामीवीरांनी धडाकेबाज सुरूवात करत पहिल्या विकेट साठी ३७ षटकात २२७ धावांची भागिदारी केली. राहुलला जोसेफने राॅसटनकरवी झेलबाद करत ही जोडी फोडली. राहुलने १०४ चेंडूत ८ चौकार ३ षटकारासह १०२ धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीस आलेला कोहली आक्रमक खेळ करेल अस वाटत होत पण कायरन पोलार्डने राॅसटनकरवी त्याला शून्यावर बाद करत माघारी धाडल. त्यानंतर रोहितने अय्यरसोबत तिस-या विकेटसाठी ६० धावा जोडल्या. रोहितला काॅटरेलने होपकरवी झेलबाद करत रोहित शर्मा नावाच वादळ शांत केलं. रोहितने १३८ चेंडूत १७ चौकार व ५ षटकारासह १५९ धावा केल्या. रोहित बाद झाला तेव्हा भारताच्या ३ बाद २९२ धावा होत्या.

त्यानंतर श्रेय्यस अय्यर आणि रिषभ पंत यांनी अखेरच्या षटकात फटकेबाजी करत भारताची धावसंख्या ३५० पार नेली. रिषभ पंतने १६ चेंडूत ३चौकार व ४ षटकरासह ३९ तर अय्यरने ३२ चेंडूत ३ चौकार व ४ षटकारासह ५३ धावांची खेळी केली. त्यानंतर केदार जाधवने १० चेंडूत १६ धावा करत भारताची धावसंख्या ५० षटकात ५ बाद ३८७ पर्यंत नेली.

वेस्टइंडिजकडून गोलंदाजीत शेल्डन काॅटरेलने ९ षटकात ८३ धावा देत २ गडी बाद केले. तर कायरन पोलार्ड, अलजारी जोसेफ आणि कीमो पाॅलने १ गडी बाद केला.

Leave A Reply

Your email address will not be published.