Wednesday, September 28, 2022

इंदुरीकर महाराज यांच्या वाहनाला अपघात

- Advertisement -

जालना, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

किर्तनकार ह.भ.प निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या वाहनाला अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. किर्तनासाठी जात असताना जालना जिल्ह्यातील परतूर येथे रात्री 10 च्या सुमारास त्यांच्या स्कॉर्पिओ गाडीचा अपघात झाला. या अपघातात इंदरोकर महाराजांना कोणतीच इजा झाली नसून चालक किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

- Advertisement -

- Advertisement -

इंदोरीकर महाराज जालना जिल्ह्यातील खांडवीवाडी येथून किर्तनासाठी जात असताना परतूर येथे एका वळणावर त्यांच्या स्कार्पिओ गाडीची लाकडाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला धडक बसली. एमएच 12 टीवाय 1744 या क्रमांकाच्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओने ते प्रवास करत होते.

परतूर शहरातील साईनाथ कॉर्नरवर रस्ता क्रॉस करताना हा किरकोळ अपघात झाला. यावेळी जखमी चालक संजय गायकवाड यांना पोलिसांच्या मदतीने शहरातील अस्थिरोग तज्ञांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शामसुंदर शामसुंदर कौठाळे यांनी दिली आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या