Saturday, December 3, 2022

Breking : फुटबॉल मॅचमध्ये मृत्यूचा थरार; 127 जणांचा बळी (व्हिडीओ)

- Advertisement -

लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

इंडोनेशियामध्ये (Indonesia) एक धक्कादायक घटना घडली आहे. इंडोनेशियामध्ये फुटबॉल सामन्यादरम्यान (Indonesia Football Match) मोठा गोंधळ आणि हिंसाचार झाल्याने 127 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून त्यात दोन पोलिसांचाही समावेश आहे.

- Advertisement -

- Advertisement -

अरेमा एफसी (Arema FC) आणि पर्सेबाया सुराबाया (Persebaya Surabaya) यांच्यात झालेल्या या सामन्यात अरेमाचा संघ पराभूत होताच, त्याच्या हताश समर्थकांनी मैदानावर गोंधळ घातला. स्टेडियममधील चेंगराचेंगरी रोखण्यासाठी पोलीस पुढे आले. मात्र, त्यांनाही ते थांबवता आलं नाही. स्टेडियममध्येच डझनभर लोकांचा मृत्यू झाला. उर्वरितांना रुग्णालयात नेण्यात आलं, तिथं त्यांचा मृत्यू झाला.

न्यूज एजन्सी एएफपीनं पोलिसांच्या हवाल्यानं सांगितलं की, पूर्व जावा येथील एका स्टेडियममधील सामन्यातील पराभवामुळं निराश झालेल्या प्रेक्षकांनी फुटबॉल खेळपट्टीवरच गोंधळ घातला. या चेंगराचेंगरी आणि हिंसाचारात दोन पोलिसांनाही आपला जीव गमवावा लागला. स्टेडियममध्ये झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत 127 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. जखमींना रुग्णालयात नेण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ही घटना पूर्व जावाच्या मलंग भागातील कंजुरुहान स्टेडियममध्ये (Kanjuruhan stadium) घडली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अनेक व्हिडिओंमध्ये लोकांनी सीमा ओलांडून पळून जाण्याचाही प्रयत्न केल्याचं दिसून येतं. स्टेडियममध्ये झालेल्या गोंधळानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्याचा वापर केला. स्टेडियममधील गोंधळ काही वेळात थांबला, पण संतप्त लोक रस्त्यावर आले आहेत. हिंसाचाराच्या विविध घटनांमध्ये 200 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या