भारताचा विजय

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
गुवाहाटी : विराट कोहलीचे दमदार शतक आणि गोलंदाजांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने पहिल्याच वनडे सामन्यात श्रीलंकेला धुळ चारली. कोहलीच्या शतकाच्या जोरावर भारताने श्रीलंकेपुढे २७४ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या संघाला चांगली फलंदाजी करत आली नाही आणि त्याला पराभव झाला. भारताने यावेळी ६७ धावांनी विजय साकारला आणि या विजयासह टीम इंडियाने या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
रोहित आणि गिल या दोघांनी आपली अर्धशतके झळकावली व शतकाच्या दिशेने कूच केली. दोघेही सलामीवीर आता शतक झळकावतील, अशी आशा चाहत्यांना होती. पण चाहत्यांची यावेळी निराशा झाली. कारण गिल यावेळी बाद झाला आणि जमलेली जोडी फुटली. गिलने यावेळी ६० चेंडूंत ११ चौकारांच्या जोरावर ७० धावांची दमदार खेळी साकारली. त्याचबरोबर गिल आणि रोहित यांनी यावेळी १४३ धावांची सलामी दिली. गिल बाद झाल्यावरही रोहितने काही काळ चांगली फलंदाजी केली. त्याला विराट कोहलीची यावेळी चांगली साथ मिळाली. रोहितने ८० धावांची वेस ओलांडली आणि तो शतकासमीप पोहोचत होता. पण यावेळी मोठा फटका खेळण्याच्या नादात रोहितचा अंदाच चुकला आणि तो क्लीन बोल्ड झाला. रोहितने यावेळी ६७ चेंडूंत ९ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ८३ धावांची नेत्रदीपक खेळी साकारली. रोहित बाद झाल्यावर लोकेश राहुल, श्रेयस अय्यर आणि हार्दिक पंड्या यांना मोठी खेळी साकारता आली नाही. पण कोहलीने मात्र दुसरी बाजू चांगली लावून धरली आणि त्याने ४५वे शतक झळकावले. कोहलीने यावेळी ८७ चेंडूंत १२ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ११३ धावांची धडाकेबाज खेळी केली.
भारताच्या ३७४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना भारताचा वेगवान गोलंदाज मोह्ममद सिराजने एकामागून एक दोन धक्के दिले. त्यानंतर उमरान मलिकने श्रीलंकेच्या तीन फलंदजाांना तंबूचा रस्ता दाखवला आणि त्यांचे कंबरडे मोडले. श्रीलंकेचा सलामीवीर पथुम निसांकाने यावेळी ११ चौकारांच्या जोरावर ७२ धावांची दमदार खेळी साकारली खरी, पण त्याला अन्य खेळाडूंची चांगली साथ मिळाली नाही आणि त्यामुळेच श्रीलंकेला भारताच्या आव्हानाचा पाठलाग करता आला नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.