Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीचे जागावाटप गिरीश महाजनांकडे!
    • लाचखोर अभियंता शिसोदे यांच्याकडे सव्वा पाच कोटींचे घबाड
    • नवी मुंबईत गोळीबार : दोन तरुणी गंभीर जखमी
    • राज्यातील शेतकऱ्यांची दुष्काळ निधी मिळवताना परवड
    • अजितदादांच्या पक्षात होणार उलथापालथ?
    • अमिताभ बच्चनच्या ‘जलसा’वर दहशतीचे सावट!
    • दानाचे महत्व सांगणारी ‘धनत्रयोदशी’!
    • सात अटी मान्य करा, अन्यथा होर्मुजची खाडी खुली नाही!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»राष्ट्रीय»इराणमधील भारतीयांना तात्काळ देश सोडण्याचा सल्ला
    राष्ट्रीय

    इराणमधील भारतीयांना तात्काळ देश सोडण्याचा सल्ला

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveFebruary 23, 2026No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    इराण-अमेरिका यांच्यातील संघर्ष आता स्फोटक वळणावर आल्याची स्थिती झाली आहे. इराणची राजधानी तेहरानवर अमेरिकेकडून मोठा लष्करी हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे जगभरात एकच खळबळ उडाली आहे. या युद्धाच्या सावटामुळे मोदी सरकारने इराणमधील भारतील नागरिकांना महत्त्वाच्या आपत्कालीन सूचना जारी केल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत इराण देश सोडा, अस इशारा मोदी सरकारकडून इराणमधील भारतीय नागरिकांना दिला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाकडून याबाबतची पोस्ट सोशल मीडियावर केली आहे.

    भारतीय दूतावासाने जारी केलेल्या या आपत्कालीन सूचनेमुळे इराणमधील भारतीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अमेरिकेच्या हालचाली आणि इराणची आक्रमक पवित्रामुळे युद्धाची स्थिती तयार झालेली आहे. त्यामुळे पुढील काही तास निर्णायक ठरणार आहेत.

    इराणमधील बदलती परिस्थिती लक्षात घेता. येथे असलेले सर्व भारतीय नागरिक, विद्यार्थी, पर्यटक, व्यावसायिक आणि यात्रेकरू यांनी तात्काळ इराण सोडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सर्व भारतीय नागरिक आणि भारतीय वंशाच्या व्यक्तींनी अत्यंत सावधगिरी बाळगावी. आंदोलने किंवा निदर्शने होत असलेल्या ठिकाणांपासून दूर राहावे. सर्वांनी आपले पासपोर्ट आणि इतर ओळखपत्रे सोबत आणि तयार ठेवावीत. स्थानिक माध्यमांच्या बातम्यांवर लक्ष ठेवा आणि कोणत्याही मदतीसाठी भारतीय दूतावासाच्या संपर्कात राहा, असे आवाहन दूतावासाकडून करण्यात आलेय.

    इराणमध्ये असणाऱ्या काही भारतीयांनी अद्याप दूतावासाकडे नोंदणी केलेली नाही. त्यांनी तात्काळ दूतावासाकडे आपली नोंदणी करावी. त्यासाठी https://www.meaers.com/request/home या लिंकचा वापर करावा. इराणमध्ये इंटरनेटची समस्या असल्यास भारतातील त्यांच्या नातेवाईकांनी ही नोंदणी करावी, असे आवाहन दूतावासाकडून करण्यात आले आहे. भारतीय दूतावासाकडून इराणमधील भारतीय नागरिकांसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी केले आहेत. +989128109115, +989128109109, +989128109102, +989932179359 या हेल्पलाइनवर अथवा cons.tehran@mea.gov.in या मेलवर संपर्क साधण्याचे आवाहन दूतावासाकडून करण्यात आले आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #iran #Tehran #US India Indian Embassy Iran-US Security
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    भयंकर! एकाच कुटुंबातील ७ जणांची निर्घृण हत्या!

    November 6, 2026

    ओबीसी क्रिमिलियरबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

    November 6, 2026

    मच्छीमारांच्या बचावासाठी गेलेल्या दोन बोटी उलटल्या

    November 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif