भरती अभावी संधी गमावलेल्या युवकांना वयोमर्यादेत सवलत द्यावी- श्रीनिवास पाटील

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

सातारा 

कराड;  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गत दोन वर्षापासून सैन्य भरती प्रक्रिया बंद आहे. कोरोना संकटाचे सावट कमी होत असल्यामुळे केंद्र सरकारने सैन्य भरती मेळावे घेऊन देशसेवा करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या तरुणांना दिलासा द्यावा.

तसेच भरती अभावी संधी गमावलेल्या युवकांना विशेष बाब म्हणून वयोमर्यादेत सवलत द्यावी, अशी अग्रणी मागणी खासदार श्रीनिवास पाटील (Srinivas Patil) यांनी आज (मंगळवार ) लोकसभेत केली.

खासदार श्रीनिवास पाटील यांनी लोकसभेत नियम ३७७ नुसार तातडीचे व लोकहितासाठी महत्वाचे मुद्दे सादर करून ते सभागृहाच्या पटलावर ठेवले. खासदार पाटील (Srinivas Patil) म्हणाले  की, कोरोना महामारीमुळे महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांपासून भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलातील भरती बंद आहे.

विशेषत: सातारा जिल्ह्याला फार मोठी सैनिकी परंपरा आहे. सातारा जिल्ह्यातून सैन्यदलात भरती होण्याचे प्रमाण प्रचंड आहे. येथील बहुतांश युवक सैन्यदलात जाण्यासाठी प्राधान्य देतात. त्यासाठी ते दोन-दोन वर्षे अगोदर शारीरिक व अन्य परिक्षेची तयारी करत असतात.

सैन्यदलात जाण्याचे स्वप्न बाळगणारे तरुण त्यासाठी खूप मेहनत घेतात. मात्र, कोरोनाने ओढावलेल्या परिस्थितीमुळे सैन्य भरती प्रक्रिया वारंवार स्थगित होत आहे. परिणामी त्यांची आलेली संधी हुकत असून त्यांचे स्वप्न हिरावून जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.