Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्ह्यात तीन हजार गणेश मंडळ; 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त!
    • लाडक्या बाप्पांचे उत्साहात आगमन!
    • जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मोर्चाची रणनीती ठरली!
    • आता गुरुजी सांगणार देश-विदेशात ऑनलाइन गणेश स्थापना
    • कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा
    • एमपीएससी परीक्षा प्रक्रिया : विद्यार्थ्यांसमोर शासन झुकले
    • एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे
    • अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, कच्चा है!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»राष्ट्रीय»भारत आणि चीनचे सैनिक पुन्हा एकदा आमनेसामने
    राष्ट्रीय

    भारत आणि चीनचे सैनिक पुन्हा एकदा आमनेसामने

    सीमावर्ती भागात पुन्हा एकदा सुरक्षेची मोठी चिंता
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 12, 2026No Comments267 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    भारत आणि चीन सीमेवरून एक मोठी बातमी समोर येत आहे. अरुणाचल प्रदेशातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) ६ वर्षांनंतर भारत आणि चीनचे सैनिक पुन्हा एकदा आमनेसामने आल्याची घटना घडली आहे. २०२० मधील गल्वान खोऱ्यातील घटनेनंतर सीमेवर काही प्रमाणात शांतता होती. पण आता अरुणाचल सीमेवर झालेल्या या नव्या चकमकीमुळे आणि दोन्ही सैन्यांमधील तणावामुळे सीमावर्ती भागात पुन्हा एकदा सुरक्षेची मोठी चिंता निर्माण झाली आहे.

    अरुणाचल प्रदेशजवळ LAC वर भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये पुन्हा एकदा तणावाची स्थिती झाली आहे. त्यामुळे सीमा पुन्हा चर्चेत आली आहे. गस्तीदरम्यान दोन्ही बाजूंचे सैनिक एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे एक छायाचित्र समोर आले आहे.

    भारतीय लष्कराने या छायाचित्रावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. पण हे छायाचित्र २६ जुलै रोजीचे असल्याचे मानले जात आहे. LAC वर गस्त घालत असताना भारत आणि चीनचे सैनिक कथितरित्या समोरासमोर आले होते आणि त्यांनी ध्वज कवायत केली होती.

    चिनी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये लिहिलेला एक बॅनर घेऊन चिनी सैनिक उभे असलेले दिसले. दोन्ही बाजूंच्या वरिष्ठ कमांडरांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. पण त्याआधी हा कथित संघर्ष जवळपास एक आठवडाभर सुरू होता असा दावा काही रिपोर्टमध्ये केला जातोय.

    LAC च्या अरुणाचल प्रदेश भागातील ही महत्त्वाची घटना आहे. कारण, यापूर्वी २०१७ मध्ये डोकलाम सेक्टरमध्ये दोन्ही देशांचे सैनिक एकमेकांसमोर आले होते. छायाचित्रासोबतच्या माहितीनुसार, सैनिक अनेक दिवस आमनेसामने उभे ठाकले होते. वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर अखेरीस परिस्थिती निवळली.

    यापूर्वी २०२० मध्ये पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर दोन्ही सैन्य एकमेकांसमोर उभे ठाकले होते. १५ जून २०२० रोजी झालेल्या एका भीषण हाणामारीत या संघर्षाची परिणती झाली. यात २० भारतीय सैनिक शहीद झाले आणि चिनी सैनिकांच्या मृत्युची संख्या जाहीर करण्यात आलेली नाही.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट

    September 9, 2026

    विजय थलपती विरोधात विरोधक एकवटले

    September 9, 2026

    गोंधळ करणाऱ्यांना हटकल्याने संगीतकाराची हत्या

    September 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif