WWE सुपरस्टार “The Rock” सुद्धा पाहतोय भारत विरुद्ध पाक सामन्याची वाट… (व्हिडिओ)

0

 

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क:

यंदाच्या T20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यावर जगाच्या नजरा खिळल्या आहेत. पण आपल्या सर्वांव्यतिरिक्त एक खास व्यक्ती आहे जी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याबद्दल खूप उत्सुक आहे आणि ती व्यक्ती म्हणजे हॉलिवूड आणि WWE सुपरस्टार ‘द रॉक’ ड्वेन जॉनसन आहे.

स्टार स्पोर्ट्सने ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये प्रसिद्ध अभिनेता (ड्वेन जॉन्सन) आगामी सामन्याबद्दल उत्सुकता व्यक्त करताना दिसत आहे. “जेव्हा सर्वात मोठे प्रतिस्पर्धी एकमेकांशी भिडतील तेव्हा जग थांबेल. हा फक्त क्रिकेटचा सामना नाही. ही भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची वेळ आहे,” असे त्याने व्हिडीओ मध्ये म्हटले आहे.

सोमवारी T20 विश्वचषकाच्या सराव सामन्यात (IND vs AUS) भारताने ऑस्ट्रेलियाचा सहा धावांनी पराभव केला. भारताचा पुढील आणि शेवटचा सराव सामना (भारत विरुद्ध न्यूझीलंड) 19 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंडसोबत होईल.

ICC T20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद शमी.

Leave A Reply

Your email address will not be published.