मेगा भरती ! इंडिया पोस्टमध्ये ९८००० जागांची भरती, असा करा अर्ज

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. इंडिया पोस्ट हे भारतात सरकारी उपक्रम चालवणाली पोस्ट ऑफीसची यंत्रणा आहे. ही यंत्रणा भरत सरकारच्या अंतर्गत आहे. यासाठी ९८, ०८३ जागा आहेत. ज्यात पोस्टमॅन पदासाठी ५९,०९९, मेल गार्डसाठी १४४५, मल्टीटीस्कींग स्टाफ म्हणून ३७, ५३९ जागा आहेत. या जागा देशभरात २३ ठिकाणी भरल्या जाणार आहेत.

१० वी, १२ वी पास विद्यार्थी या जागासाठी अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी पोस्ट ऑफीस व्हॅकेन्सी २०२२ (Post Office Vacancy 2022) च्या संकेतस्थळावर भेट द्या.

पदे आणि शैक्षणिक पात्रता 

पोस्टमॅन पदासाठी – मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी किंवा १२ वी पास असावे.

मेलगार्ड पदासाठी – मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी किंवा १२ वी पास असावे. कम्प्युटरचं बेसिक ज्ञान असावं.

एमटीएस पदासाठी – मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी किंवा १२ वी पास असावे. कम्प्युटरचं बेसिक ज्ञान असावं.

 वयोमर्यादा

या पदांसाठी अर्जदाराची वयोमर्यादा १८ ते ३२ वर्ष एवढी आहे.

श्रेणींसाठी सवलती

एसटी/एससी – ५ वर्ष अधिक म्हणजे ३८ वर्षापर्यंत

ओबीसी – ३५ वर्षापर्यंत

इडब्ल्युसी – एनए, पीडब्ल्यु साठी १० वर्ष अधिक, ओबीसी १३ वर्ष अधिक

पीडब्ल्यूडी एससी/एसटी १५ वर्ष अधिक

पगार

३३, ७१८ ते ३५, ३७० रुपये प्रती महिना.

परिक्षा फी

यासाठी १०० रुपये परिक्षा फी असणार आहे. सर्व महिला, सर्व जातीय श्रेणी आणि ट्रांस वूमन अर्जदार यांना या फीमध्ये सूट देण्यात आली आहे.

असा करा अर्ज

http://www.indiapost.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

Leave A Reply

Your email address will not be published.