Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • विधान परिषदेच्या 17 जागांचा बिगुल वाजला!
    • एक दिवसाच्या उपचारासाठी उकळले ३ लाखांचे बील
    • शिवराज मोटेगांवकरांना सीबीआयकडून अटक
    • व्ही. डी. सतीशन यांनी घेतली केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
    • पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरलाच पाहिजे; अन्यथा भविष्यात संघर्ष अटळ!
    • रावेरला 18 दिव्यांग जोडप्यांचा सामूहिक विवाह उत्साहात
    • नीट पेपरफुटी प्रकरणामागे सर्व भाजपचेच नेते
    • नीट पेपर फुटी प्रकरणात पेपर सेटर्सनीच केला घात!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»मोठा हल्ला.. भारताकडून पाकिस्तानचे एअरबेस उद्ध्वस्त
    ताज्या बातम्या

    मोठा हल्ला.. भारताकडून पाकिस्तानचे एअरबेस उद्ध्वस्त

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 10, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही न्यूज नेटवर्क 

    भारत पाकिस्तानमध्ये अजूनही तणाव सुरूच आहे. अंधार पडताच गेल्या दोन दिवसांपासून पाकिस्तान सीमेवरील भारतीय शहरांवर हल्ले करण्यासाठी ड्रोन पाठवत आहे. भारत हे सर्व ड्रोन हवेतच नष्ट करत आहे. पाकिस्तानची ही आगळीक पाकिस्तानलाच भारी पडली आहे. भारताने आज पहाटे पाकिस्तानवर जोरदार हल्ला केला आहे. भारताने पाठविलेल्या ड्रोननी इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट घडविले असून रावळपिंडी एअरबेसजवळही धुराचे लोळ उठल्याचे पहायला मिळत आहेत.

    भारताने पाकिस्तानवर अनेक ठिकाणी ड्रोन हल्ले केले आहेत. शुक्रवारी सायंकाळी पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यानंतर सीमाभागात ब्लॅकआऊट करण्यात आले होते. ते रात्री १२ च्या सुमारास हल्ला परतवून लावल्यानंतर उठविण्यात आले. नागरिक हवी असेल तर लाईट चालू करू शकत होते. परंतू, आकाशात पुन्हा काही भागात ड्रोनच्या हालचाली दिसल्याने जालंधरसह पंजाबच्या काही भागात पुन्हा ब्लॅक आऊट करण्यात आले आहे.

    पाकिस्तान सीमेपलीकडून पंजाबमधील अनेक शहरांच्या निवासी भागात हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहे. अमृतसरमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. अमृतसरच्या उपायुक्तांनी लोकांना त्यांच्या घरातील दिवे बंद करण्याचे आणि खिडक्यांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. वीजपुरवठा खंडित झाला आहे. जम्मू आणि काश्मीरच्या अखनूरमध्ये पूर्णपणे ब्लॅकआउट लागू करण्यात आला आहे. स्फोटांचे आणि सायरनचे आवाज ऐकू आले आहेत.

    दरम्यान, भारताकडून पाकिस्तानला जशासतसे प्रत्यूत्तर दिले जात आहे. पाकिस्तानच्या नरवाल, रावळपिंडीवर भारताने हल्ला केला आहे. याचे व्हिडीओ, फोटो आले आहेत. पाकिस्तानातील रावळपिंडी येथील नूर खान एअरबेसवर स्फोट झाल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानी हवाई दलाचे IL-78 विमान या एअरबेसवर तैनात आहेत. ज्यामध्ये हवेतून हवेत इंधन भरण्याची क्षमता आहे.शुक्रवारी सकाळी फ्लाइट ट्रॅकिंग अॅप्सवर, एक IL-78 विमान तुर्कीहून परतताना दिसले होते.

     

    एअरबेसवर हल्ला…

    भारतीय वायूदलाची लढाऊ विमाने शनिवारी सकाळी पाकिस्तानमध्ये घुसली होती.  या विमानांनी क्षेपणास्त्रांनी तीन ते चार हवाई तळांवर हल्ले केले आहेत.  रावळपिंडीलगतच्या नूर खान हवाई तळाला भारताच्या लढाऊ विमानांनी लक्ष्य केले आहे. याशिवाय, मुरीद आणि सुकूर या हवाई तळांवरही भारतीय हवाईदलाच्या लढाऊ विमानांनी हल्ला चढवला होता. या हवाई हल्ल्यात पाकिस्तानचे खूप मोठे नुकसान झाल्याची माहिती आहे. पाकिस्तानच्या एअर डिफेन्स यंत्रणेला चकवा देऊन भारताची क्षेपणास्त्रे अचूकपणे जाऊन लक्ष्यावर आदळली. हे भारताच्यादृष्टीने खूप मोठे यश मानले जात आहे. यानिमित्ताने भारतीय हवाई दल पाकिस्तानपेक्षा किती सरस आहे, हे दिसून आले आहे.  याशिवाय, पाकिस्तानच्या सरगोधा हवाई तळावरही काहीवेळापूर्वी मोठा स्फोट झाला आहे. तसेच भारतीय सैन्याकडून सियालकोटमधील लुनी दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आला आहे. यामध्ये अनेक दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे.

     

    India Pakistan War
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    रील्सच्या माध्यमातून जनजागृती करा!

    May 16, 2026

    ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी देशव्यापी संप

    May 16, 2026

    जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

    May 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif