के.एल.राहुलचा टेस्ट सिरीज मध्ये पत्ता कट !

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

भारत (India) पुढच्या ९ फेब्रुवारीला ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्ध चार कसोटी सामन्यांची हायप्रोफाईल टेस्ट सीरीज खेळणार आहे. भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान पहिला कसोटी सामना ९ फेब्रुवारीला नागपूरमध्ये (Nagpur) खेळला जाणार आहे. त्याबरोबरच रोहित शर्मा (Rohit Sharma) टेस्ट सीरीजमध्ये टीम इंडियाच नेतृत्व करताना दिसेल. ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या चार कसोटी सामन्यांच्या सीरीजमध्ये केएल राहुल (KL Rahul) खेळ कि नाही यावर अजून स्पष्टीकरण मिळाले नाही. टीम इंडियाकडे एक खतरनाक खेळाडू आहे, जो ऑस्ट्रेलिया विरुद्ध टेस्ट सीरीजसाठी केएल राहुलचा पत्ता कट करु शकतो.

नुकतच केएल राहुल अभिनेत्री आथिया शेट्टीसोबत (Athiya Shetty) विवाहबद्ध झाला. ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी केएल राहुलचा टीम इंडियात समावेश करण्यात आला आहे. पण राहुलला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणं कठीण दिसत आहे. कॅप्टन रोहित शर्माकडे एक खतरनाक अस्त्र आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध टेस्ट सीरीजमध्ये तो प्लेइंग 11 मध्ये खेळताना दिसू शकतो. याच खेळाडूमुळे केएल राहुलच प्लेइंग इलेव्हनमधील स्थान धोक्यात आहे.

राहुलच्या टेस्ट करिअरला ‘कोणत्या’ खेळाडूपासून धोका

टीम इंडियाचा स्टार ओपनर शुभमन गिल (Shubman Gill) सध्या फॉर्मात आहे. 23 वर्षीय स्टार ओपनर शुभमन गिलने 21 वनडे सामन्यात 73.76 च्या सरासरीने 109.80 च्या स्ट्राइक रेटने 1254 धावा केल्या आहेत. शुभमन गिलने आपल्या 19 व्या वनडे इनिंगमध्ये 1000 धावा पूर्ण केल्या. शुभमन गिलने आपल्या शेवटच्या चार वनडे मॅचेसमध्ये तीन शतक झळकवली आहेत. यावरुन तो किती जबरदस्त फॉर्ममध्ये आहे ते समज आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.