26 जानेवारी पासून गिरणा पात्रातच बेमुदत उपोषण?

गिरणा नदी पात्रातील अवैध वाळू बंद करा अन्यथा.. : तहसीलदार शितल सोलाट यांना निवेदन

0

 

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

शहरातील व तालुक्यातील गिरणा नदीपात्रात विषेशत: पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीजवळ मोठ्याप्रणात अवैध वाळू उपसा सुरू आहे. याबाबत प्रशासनाला निवेदन देऊन ही उपसा थांबत नसल्याने वडजी येथील पत्रकार सुधाकर पाटील, उपसरपंच स्वदेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य दिनेश परदेशी यांनी तहसीलदार शितल सोलाट यांना निवेदन देत 26 जानेवारीपासून गावातील गिरणा पात्रात उपोषणाचा इशारा दिला आहे.

तालुक्यातील वडजी हद्दीत गिरणा नदि पात्रातुन मोठ्याप्रणात अवैध वाळू उपसा सुरू आहे. वाळूचोर हे तेथे असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या जवळून वाळू उपसा करत आहेत. याबाबत ग्रामपंचायतीने वारंवार निवेदन दिले आहे. मात्र तरीही हा वाळू उपसा बंद होण्याऐवजी वाढतच असल्याचे चित्र आहे.

 

..तर पाणीटंचाईचे संकट!

वडजी येथे गिरणा नदिवर वडजी, रोकडा फार्म, पळासेडे-रुपनगर, वडगाव-नालबंदी, महीदंळे या गावाच्या पाणीपुरवठा योजना आहेत. सततच्या वाळू उपशामुळे या सर्व गावांना आगामी काळात पाणीटंचाईला सामोरे जावे लागू शकते. वाळूचोरांची विहीरींना खेटून वाळू उपसा सुरू केला आहे. तर या भागातील शेती ज्या गिरणा नदिवर अवलंबून आहे. ती ही धोक्यात येण्याचे चिन्ह आहेत.

 

तहसीलदारांनी दखल घेत वडजीत धडक

काल दुपारी पत्रकार सुधाकर पाटील, उपसरपंच स्वदेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य दिनेश परदेशी यांनी वडजी गावाच्या हद्दीतून वाळू उपसा बंद होत नसल्याने त्याविरोधात 26 जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिनापासून गिरणा नदि पात्रात उपोषणाचा निवेदनाव्दारे इशारा दिला. तहसीलदार शितल सोलाट यांनी तत्काळ दखल घेत वडजी गावाला भेट देत अवैध वाळू वाहतुकीचा आढावा घेतला. ग्रामपंचायत कार्यालयात त्यांनी सरपंच मनिषा गायकवाड यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. त्यात त्यांनी ग्रामपंचायतीसह,

स्थानिक प्रशासनाला सुचना केल्या. तर गावातील नागरीकांनी वाळूचोरी करू नये असे अहवान केले. येथील वाळूचोरीला पायबंद घालण्याबाबत उपस्थितांना अश्वस्त केले. यावेळी ग्रामस्थांनी वाळूचोरीबाबत तक्रारी मांडल्या. तर तत्काळ वाळूचोरीला आळा घालण्याची मागणी केली.

 

26 जानेवारीपासून उपोषण

दरम्यान वडजी गावाच्या हद्दीतून होत असलेल्या अवैध वाळू उपशाला पायबंद घातला नाही तर 26 जानेवारीत पासून गिरणा नदिपात्रात सुधाकर पाटील, स्वदेश पाटील, दिनेश परदेशी हे उपोषणाला बसणार आहे. काल तहसीलदार शितल सोलाट यांनी ग्रामपंचायतीत घेतलेल्या बैठकीत ही हे त्यांनी स्पष्ट केले. या वाळू उपशामुळे तरूणांमधे व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत आहेत. शिवाय शेती आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ याबाबत पाऊले उचलावीत अशी मागणी होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.