मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये चार कसोटी सामन्यांची मालिका 9 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. ही सीरीज सुरु होण्याआधीच ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजाने आपले शस्त्र खाली ठेवले आहेत. बॉर्डर-गावस्कर सीरीज (Border-Gavaskar Series) दरम्यान भारतीय पीचेसवर बॉलिंग करणं कठीण असेल, असं ऑस्ट्रेलियन युवा वेगवान गोलंदाज लान्स मॉरिसच (Lance Morris) म्हणणं आहे. भारतात शिकायला मिळेल, ती संधी मी सोडणार नाही, असं मॉरिस म्हणाला. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन टीम उद्या भारतात दाखल होईल.
भारताविरुद्ध मिळू शकते संधी
ऑस्ट्रेलियाने 24 वर्षीय लान्स मॉरिसला 18 सदस्यीय टेस्ट टीममध्ये स्थान दिले. सिडनीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या आणि अंतिम कसोटीत त्याची पुन्हा संघात येण्याची संधी हुकली. भारताविरुद्ध चार कसोटी सामन्यात त्याला ऑस्ट्रेलियन टीममधून संधी मिळू शकते.