Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • विधान परिषदेच्या 17 जागांचा बिगुल वाजला!
    • एक दिवसाच्या उपचारासाठी उकळले ३ लाखांचे बील
    • शिवराज मोटेगांवकरांना सीबीआयकडून अटक
    • व्ही. डी. सतीशन यांनी घेतली केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
    • पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरलाच पाहिजे; अन्यथा भविष्यात संघर्ष अटळ!
    • रावेरला 18 दिव्यांग जोडप्यांचा सामूहिक विवाह उत्साहात
    • नीट पेपरफुटी प्रकरणामागे सर्व भाजपचेच नेते
    • नीट पेपर फुटी प्रकरणात पेपर सेटर्सनीच केला घात!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»लोकार्थ»केंद्रीय कर्मचाऱ्यांची चांदी : पगारात पुन्ह्या वाढ
    लोकार्थ

    केंद्रीय कर्मचाऱ्यांची चांदी : पगारात पुन्ह्या वाढ

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 11, 2024No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    केंद्र सरकारने जुलै महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात अर्थात डीए मध्ये 3% वाढ केली होती. त्यानंतर डीए 53 टक्के इतका झाला. आता सरकारने दोन अजून भत्त्यात वाढ केली आहे. आता त्याचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या वेतनावर दिसेल. आता त्यांचा पगार वाढणार आहे. नर्सिंग भत्ता आणि ड्रेस भत्त्यात ही वाढ करण्यात आली आहे. महागाई भत्ता 50% झाल्यावर ,7 व्या वेतन आयोगने इतर भत्त्यात वाढ सुचवली होती.

    सप्टेंबर महिन्यात नर्सिंग भत्ता आणि ड्रेस भत्ता दोन्हींसाठी पात्रता निकषात सुधारणा करण्यात आली. 4 जुलै 2024 रोजी EPFO ने याविषयीचे एक परिपत्रक काढले. त्यानुसार, महागाई भत्ता 50% झाल्यानंतर इतर ज्या भत्त्यांवर परिणाम होईल, त्यात 25% वाढ करण्यात येईल. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने 17 सप्टेंबर 2024 रोजी याविषयीची वाढ केली.

    नर्सिंग भत्ता हा सर्व नर्सेसला देण्यात येतो. आता यामध्ये 25% वाढ करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने 17 सप्टेंबर 2024 रोजी याविषयी माहिती दिली होती. त्यानुसार, नर्सिंग भत्ता त्यावेळी वाढले, ज्यावेळी महागाई भत्ता 50% अधिक होईल. केंद्रीय वेतन आयोग प्रत्येक 10 वर्षानंतर तयार होतो. हे सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते आणि लाभ यांचे मुल्यांकन करते. 7 व्या वेतन आयोगाच्या शिफारशी 1 जानेवारी 2016 रोजी लागू करण्यात आल्या होत्या. 17 सप्टेंबर 2024 नुसार ज्यावेळी महागाई भत्ता 50% वाढतो, त्यावेळी 25% वाढवण्यात येतो.

    केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात आणि निवृती वेतनधारकांच्या महागाई दिलासा (DR) दिवाळीपूर्वीच वाढवला होता. त्यात 3 टक्क्यांची वाढ करण्यात आली होता. केंद्रीय कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची दिवाळीपूर्वीच दिवाळी साजरी झाली होती. देशातील 1.15 कोटी कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फायदा झाला होता. 1 जुलै 2024 रोजीपासून पूर्वलक्षी प्रभावाने ही 3 टक्के वाढ लागू करण्यात आली होती. यामुळे केंद्र सरकारच्या तिजोरीवर 9,448 कोटींचा बोजा पडला होता. औद्योगिक कामगार-ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आकडेवारीचा त्यासाठी आधार घेण्यात आला होता.

    Allowance Hike Central Employees Central Government EPFO Salary Hike
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    एक दिवसाच्या उपचारासाठी उकळले ३ लाखांचे बील

    May 18, 2026

    व्ही. डी. सतीशन यांनी घेतली केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

    May 18, 2026

    अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोल-डिझेलची भीषण टंचाई

    May 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif