Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीचे जागावाटप गिरीश महाजनांकडे!
    • लाचखोर अभियंता शिसोदे यांच्याकडे सव्वा पाच कोटींचे घबाड
    • नवी मुंबईत गोळीबार : दोन तरुणी गंभीर जखमी
    • राज्यातील शेतकऱ्यांची दुष्काळ निधी मिळवताना परवड
    • अजितदादांच्या पक्षात होणार उलथापालथ?
    • अमिताभ बच्चनच्या ‘जलसा’वर दहशतीचे सावट!
    • दानाचे महत्व सांगणारी ‘धनत्रयोदशी’!
    • सात अटी मान्य करा, अन्यथा होर्मुजची खाडी खुली नाही!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अत्याधुनिक सीटी स्कॅन मशीनचे लोकार्पण
    जळगाव

    जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अत्याधुनिक सीटी स्कॅन मशीनचे लोकार्पण

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJanuary 27, 2026No Comments3 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
    जळगाव । जळगाव शहर व जिल्ह्यातील रुग्णांना आता गंभीर आजारांचे तात्काळ व अचूक निदान स्थानिक पातळीवरच होणार असून आरोग्यसेवेत जळगावने आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. सामान्य कुटुंबातील रुग्णाला वेळेत निदान होऊन जीव वाचावा, हाच आमचा खरा उद्देश आहे. सुरू झालेले 128 स्लाइस सीटी स्कॅन मशीन म्हणजे जळगावच्या आरोग्यसेवेसाठी क्रांतिकारी पाऊल असून अपघात, हृदयरोग, मेंदूविकार यासारख्या गंभीर आजारांमध्ये ‘गोल्डन अवर’ महत्त्वाचा असतो. ही सुविधा त्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
    प्रजासत्ताक दिनाच्या शुभप्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत सन २०२४–२५ मधील मंजूर निधीतून उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक टर्न-की प्रकल्पातील 128 स्लाइस सीटी स्कॅन मशीनचे लोकार्पण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
    अचूक निदान, कमी वेळ, अधिक सुविधा या अत्याधुनिक मशीनद्वारे मेंदूचे सीटी स्कॅन, शरीरातील विविध अवयवांचे प्लेन सीटी स्कॅन, कॉन्ट्रास्टसह सीटी स्कॅन, अब्डॉमेन व पेल्व्हिस संयुक्त तपासणी, बोन डेन्सिटोमेट्री, कार्डिएक सीटी, व्हॅस्क्युलर तसेच इतर विशेष तपासण्या कमी वेळेत व अधिक अचूकतेने करता येणार आहेत.
    या सुविधेमुळे अपघातग्रस्त रुग्ण, हृदयरुग्ण, मेंदूविकारग्रस्त तसेच गंभीर आजारांच्या रुग्णांचे तातडीने निदान होऊन उपचार सुरू करणे शक्य होणार आहे. पात्र रुग्णांना मोफत सेवा शासन निर्णयानुसार पात्र रुग्णांना ही सेवा मोफत, तर इतर रुग्णांना नाममात्र शुल्कात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांवरील खर्चाचा मोठा आर्थिक बोजा सर्वसामान्यांवर येणार नाही, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.कार्यक्रमाला वैद्यकीय महाविद्यालयातीचे डॉक्टर, कर्मचारी, वैद्यकीय शाखेचे विद्यार्थी उपस्थित होते.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    नवी मुंबईत गोळीबार : दोन तरुणी गंभीर जखमी

    November 6, 2026

    राज्यातील शेतकऱ्यांची दुष्काळ निधी मिळवताना परवड

    November 6, 2026

    अजितदादांच्या पक्षात होणार उलथापालथ?

    November 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif