बाबासाहेबांच्या संविधानामुळे देशातील समता बंधुता एकात्मता जीवंत
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन : धरणगावात आभासी पध्दतीने संविधान मंदिराचे उद्घाटन
धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था धरणगावमध्ये आभासी पध्दतीने संविधान मंदिराचे उदघाटन समारंभ उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांच्या शुभहस्ते झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मंगलप्रभात लोंढा यांचा प्रमुख उपस्थिती संपन्न झाला.
दरम्यान धरणगाव येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी संविधान मंदिरचे उदघाटन केले. यावेळी त्यानी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली तसेच विद्यार्थ्यांनी बस थांबाची मागणी व दोन कॉम्प्युटर देण्याची घोषणा केली. यावेळी प्राचार्य मराठे यांनी मान्यवरांच्या सत्कार केला.
व्यासपीठावर उपस्थित कवी संजीवकुमार सोनवणे सर गटनेते पप्पू भावे माजी सभापती मुकुंद नांनवरे, चर्मकार समाजाचे नेते भानुदास विसावे, नगरसेवक वासुदेव चौधरी, शहर प्रमुख विलास महाजन, प्रेमराज पाटील, धिरेंद्र पुरभे, विनायक महाजन, रवी महाजन, कन्हैया महाजन सोनू महाजन साहेबराव महाजन सह विध्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच संविधानचे वाचन करून यशस्वी विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. सूत्रसंचालन नेतकर सर तर आभार वाघ सरांनी मानले.