Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास वेग
    • महामार्गावर तीन नव्हे, चार उड्डाणपूल हवेत!
    • गुटखा, पान मसाला आणि इतर प्रतिबंधित उत्पादनांवर बंदी
    • मुंबई पोलीस दलाची प्रतिमा काळवंडली
    • दूध संघात उद्या प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन
    • वंदे मातरम्‌‍ला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण!
    • भाविकांच्या गाडीला अपघात : १२ जण जखमी
    • मराठी येत नसल्यास चालकाचे लायसन्स होणार रद्द!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राजकारण»नगरसेविकेच्या कार्यालयात आढळल्या नको त्या वस्तू..
    राजकारण

    नगरसेविकेच्या कार्यालयात आढळल्या नको त्या वस्तू..

    तृणमूल काँग्रेसच्या नगरसेविका अनन्या बॅनर्जी नव्या वादात
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 17, 2026No Comments629 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    पश्चिम बंगालच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. कोलकाता महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक १०९ च्या तृणमूल काँग्रेसच्या नगरसेविका अनन्या बॅनर्जी या नव्या वादात सापडल्या आहेत. मुकुंदपूर येथील त्यांच्या कार्यालयात काही आक्षेपार्ह वस्तू आढळल्याचा आरोप भाजप कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी केला आहे. या घटनेनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

    सोमवारी सकाळी पोलिस काही भाजप कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक नगरसेविकेच्या कार्यालयात पोहोचले. त्यावेळी कार्यालयात कंडोमची पाकिटे, मसाज मशीन, मोठ्या प्रमाणात रोकड आणि स्वतंत्र मेकअप रूम असल्याचे त्यांना आढळले. सरकारी कामकाजासाठी वापरल्या जाणाऱ्या कार्यालयात अशा वस्तू आढळल्याच्या आरोपामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

    या प्रकरणाला आणखी गंभीर वळण देणारी बाब म्हणजे कार्यालयातून एक पिवळ्या रंगाची नोंदवही सापडली. या नोंदवहीत काही व्यक्तींची नावे आणि आर्थिक व्यवहारांची माहिती नोंद करण्यात आली होती. यासह, सरकारी नोकऱ्या मिळवून देण्याच्या नावाखाली पैसे उकळल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र या आरोपांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.

    अनन्या बॅनर्जी या कोलकाता महानगरपालिकेतील परिचित चेहरा आहेत. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी मॉडेल आणि अभिनेत्री म्हणून काम केले होते. २००० साली ‘मिस कलकत्ता’ किताब जिंकल्यानंतर त्यांनी मनोरंजन क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली. त्यानंतर त्या राजकारणात दाखल झाल्या आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख महिला नेत्यांपैकी एक म्हणून काम करु लागल्या. दरम्यान, या आरोपांवर प्रतिक्रिया देताना अनन्या बॅनर्जी यांनी स्वतःवरील सर्व आरोप फेटाळले आहेत.

    दरम्यान कार्यालयाच्या चाव्या त्यांच्या ताब्यात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, कार्यालयात ठेवण्यात आलेल्या काही वस्तू ईदच्या काळात गरजूंना वाटप करण्यासाठी ठेवलेल्या मदत साहित्याचा भाग असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र कंडोम, मसाज मशीन आणि इतर आक्षेपार्ह वस्तूंबाबत त्यांनी कोणतीही स्पष्ट प्रतिक्रिया दिलेली नाही. या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणामुळे कोलकत्ताचे राजकारण मोठ्या प्रमाणात तापले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    गुटखा, पान मसाला आणि इतर प्रतिबंधित उत्पादनांवर बंदी

    August 12, 2026

    वंदे मातरम्‌‍ला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण!

    August 12, 2026

    आम्हाला शाहांचे भाषण ऐकण्यात काहीच स्वारस्य नाही

    August 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif