Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    • हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!
    • दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»परिसरात वीज गेली म्हणजे संपर्क तुटला!
    जळगाव जिल्हा

    परिसरात वीज गेली म्हणजे संपर्क तुटला!

    वीज गुल होताच मोबाईल नेटवर्कही गायब : ऑनलाईन व्यवहार ठप्प
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 11, 2026No Comments140 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    किनगाव-चुंचाळे परिसरात वीजपुरवठा खंडित होताच मोबाईल नेटवर्क पूर्णपणे ठप्प होत असल्याने नागरिक, व्यापारी आणि विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागत आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी परिसरातील मोबाईलधारकांकडून केली जात आहे.

    वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर मोबाईल टॉवर सुरू ठेवण्यासाठी असलेली बॅकअप यंत्रणा (बॅटरी किंवा जनरेटर) योग्य प्रकारे काम करत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे वीज जाताच मोबाईल टॉवर बंद पडतात आणि मोबाईल नेटवर्क गायब होते. सध्या अनेक नागरिक ऑनलाईन पेमेंट आणि बँकिंगच्या कामांसाठी मोबाईल इंटरनेटवर अवलंबून आहेत. मात्र, नेटवर्क बंद पडल्यामुळे दुकानदारांचे ऑनलाईन व्यवहार ठप्प होतात. परिणामी, व्यापारी आणि ग्राहकांची गैरसोय होत आहे. विद्यार्थ्यांनाही इंटरनेटच्या अभावामुळे विविध कामांत अडचणींचा सामना करावा लागत आहे.

    वीजपुरवठा खंडित होताच मोबाईल कॉल करणे आणि इंटरनेट वापरणे अशक्य होत असल्याने नातेवाईकांशी संपर्क साधणेही कठीण बनते. विशेषतः आणीबाणीच्या प्रसंगी ही समस्या गंभीर ठरू शकते. या समस्येची दखल घेऊन जिओ कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना कराव्यात आणि मोबाईल टॉवरवर सक्षम बॅकअप यंत्रणा बसवावी, अशी मागणी किनगाव-चुंचाळे परिसरातील संतप्त मोबाईलधारकांकडून केली जात आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    लोकनियुक्त नगराध्यक्षा छाया पाटील यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा!

    November 6, 2026

    जळगावमध्ये अवैध धंद्यांचे जाळे फोफावले; जुगार अड्ड्यावर गोळीबाराच्या चर्चेने खळबळ!

    November 3, 2026

    पाच महिन्यांची गर्भवती महिला अचानक कोसळली

    November 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif