केसीइ सोसायटीचे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रीसर्च येथे इंटर्नल स्मार्ट इंडिया हॅकाथोन स्पर्धेचे आयोजन

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगांव येथील के. सी. इ. सोसायटीचे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रीसर्च येथे इंटर्नल स्मार्ट इंडिया hackathon स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

या स्पर्धा मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन आयोजित स्मार्ट इंडिया Hackathon २०२२ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचाच एक भाग असून, या संदर्भातील मार्गदर्शन पर माहिती sih.gov.in या पोर्टलवर उपलब्ध आहे.

भारतभर अनेक संस्था यानिमित्ताने जोडल्या जाऊन इंडस्ट्री, Government आणि student innovation या तीन प्रकारच्या संस्था विभागात संबंधित तांत्रिक प्रश्न विविध संस्थांनी पोस्ट केलेले आहेत.

विद्यार्थ्यांनी त्यामधील प्रश्न निवडून योग्य ते कल्पक उपाय योजना सुचवायचे आहेत.या विद्यार्थी आणि विविध औद्योगिक संस्था यांचे थेट संबंध तयार होतील, विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव मिळेल हा प्रमुख उद्देश या स्मार्ट इंडिया हॅकाथोन या उपक्रमाचा आहे.

यानुसार आयएमआर ने innovation and incubation center च्या माध्यमातून या स्पर्धा इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड प्रक्रिया पार पडली.

या इंटर्नल हॅकाथोनमध्ये इन्स्टिट्यूटच्या B B.B.A., BCA, MCA आणि M BA च्या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने सहभाग नोंदवला. एकूण १२० विद्यार्थ्यांनी २० टीम मधून विविध प्रश्न निवडून त्यांच्या कल्पकतेचे प्रदर्शन केले.

प्रथम प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांना एकत्र बोलावून hackathon संबंधीची चित्रफीत दाखऊन त्यांना संपूर्ण माहिती देण्यात आली. त्यानंतर sih.gov.in वर जाऊन त्यांनी विविध प्रॉब्लेम स्टेटमेंट जाणून घेतले. त्यातून त्यांना आवडलेल्या थीम वर त्यांनी त्यावरील उपाययोजना शोधल्या.

दि.२५ मार्च रोजी सर्व विद्यार्थ्यांचे प्रेझेंटेशन घेण्यात आले.या वेळेस जयहिंद कॉलेज, धुळे येथील प्रा. प्रसाद जोशी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे प्रयोग समजावून घेतले आणि त्यांना मार्गदर्शन पर सूचना केल्या.

यातून निवडक १५ टीम्सनी त्यांच्या कल्पक प्रयोगांचे प्रदर्शन दि. २६ मार्च रोजी परीक्षकांना समोर करण्यात आले. यातून एकूण ९ टीमची निवड (SIH nomination) राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी करण्यात आली.

परीक्षक म्हणून के.सी.ई. सोसायटीच्या आयएमआर इन्फोटेकचे प्रोजेक्ट मॅनेजर योगेश चौधरी, सॉफ्टवेअर इंजिनियर धनपाल वाघुळदे तसेच आयएमआरचे प्रा. सतीश दमाडे यांनी विद्यार्थ्यांचे प्रेझेंटेशन बघून निवड प्रक्रियेत मोलाचे सहकार्य केले.

विद्यार्थ्यांनी शेतीसाठी रोबोट, ड्रोनचा वापर, विविध शैक्षणिक संस्थांचे मालमत्तांचे नियोजन करण्यास लागणारे उपयुक्त व्यवस्थापन योजना तसेच होम stay tourism, टाकाऊ वस्तू, प्लास्टिक इत्यादींसाठी उपयुक्त परिवर्तन प्रक्रिया या विविध व्यावसायिक कल्पक उत्पादन यावर अतिशय सुंदर पद्धतीने प्रदर्शन केले.

आयएमआर Innovation and incubation च्या प्रमुख प्रा. डॉ. वर्षा पाठक यांनी या सर्व उपक्रमाचे आयोजन आणि नियोजन केले. विद्यार्थांना प्रेरणा देऊन त्यांना मार्गदर्शन देण्याचे काम एमसीए विभागाचे प्रा. योगेश्वरी यावलकर, प्रा. दीपाली किरंगे, भावना जावळे तसेच एमबीए विभागाचे प्रा. मानसी भंगाळे, प्रा. जयश्री भावसार यांनी केले.

संस्थेच्या संचालिका डॉ. शिल्पा बेंडाळे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. विद्यार्थ्यासाठी याप्रकारचे उपक्रम राबविल्यास ते भविष्यात औद्योगिक जगतात नक्कीच सहभागी होऊ शकतील, नवनवीन कल्पक लोकोपयोगी उद्योग योजून त्यातून स्वतःचा आणि समाजाचाही विकास साधू शकतील असा संदेश त्यांनी यानिमित्ताने दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.