Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दलित, ओबीसींना हिंदू म्हणते अन् अधिकारापासून रोखते!
    • उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे दिल्लीत एकाच ताटात खातात!
    • ओळख लपविण्यासाठी बुरखा घालून घरी नेत अत्याचार
    • राज्यात उष्णतेची लाट; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन
    • माणसाने झेपेल तितकेच बोलावे!
    • बिबट्याच्या कातडीसह पाच तस्कर गजाआड!
    • किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका आजारी
    • शॉर्ट सर्किटमुळे मक्याच्या पिकाला आग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»नागरी लष्करी समन्वयाबाबत ‘वर्षा’वर महत्त्वाची बैठक
    महाराष्ट्र

    नागरी लष्करी समन्वयाबाबत ‘वर्षा’वर महत्त्वाची बैठक

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 12, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    नागरी लष्करी समन्वयाबाबत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली, या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह तीनही दलाचे अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानी ही बैठक पार पडली. राज्य सरकार अधिक सन्मवयानं काम करणार असल्याचं या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

    या बैठकीला लष्कराचे लेफ्टनंट जनरल पवन चढ्ढा, लष्कराचे कर्नल संदीप सील, नौदलाचे रियर अॅडमिरल अनिल जग्गी,  नौदलाचे कमांडर नितेश गर्ग, वायूदलाचे एअर वाईस मार्शल रजत मोहन, एटीएसचे प्रतिनिधी, होमगार्डचे प्रतिनिधी, रिझर्व्ह बँकेचे प्रतिनिधी, जेएनपीटीचे प्रतिनिधी, बीपीटीचे प्रतिनिधी,  मुंबई स्टॉक एक्सचेंजचे प्रतिनिधी, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे प्रतिनिधी, यांची उपस्थिती होती.

    या बैठकीमध्ये गुप्तचर माहितीचे आदानप्रदान झाले,  तंत्रज्ञानाचा अधिक वापर आणि काय खबरदारी घ्यायची यावर चर्चा झाली, संरक्षण दलांना राज्य सरकारतर्फे अपेक्षित सहकार्य आणि अधिक गतीची समन्वय यंत्रणा उभारण्यावर यावेळी चर्चा झाली आहे.

    भारतीय सैन्यानं ताकदीने आणि अधिक अचूकपणे ऑपरेशन सिंदूर राबल्याचं फडणवीस यांनी यावेळी म्हटलं आहे. ऑपपेशन सिंदूर अभूतपूर्व आहे, संरक्षण दलाला मी सॅल्युट करतो मुंबईसारखे शहर हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे, देशाची आर्थिक राजधानी आहे. यापूर्वी मुंबईवर हल्ले झाले, तेव्हा शत्रूकडून आम्ही भारताच्या आर्थिक राजधानीवर हल्ला केला हे दाखवण्याचा प्रयत्न झाला. या स्थितीत गुप्तचर माहितीचे आदानप्रदान हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. येणाऱ्या काळात संपूर्ण ताकदीने काम करावे लागेल,  सायबर सुरक्षेबाबत सर्वांनाच अधिक काळजी घ्यावी लागेल, राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी आणि संरक्षण दलाचे अधिकारी मिळून अधिक समन्वयानं एकत्रितपणे काम करू असं फडणवीस यांनी यावेळी म्हटलं आहे.

    सात मे रोजी भारतीय सैन्यदलाकडून पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानात ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं, पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करण्यात आला, या हल्ल्यात 9 दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे दिल्लीत एकाच ताटात खातात!

    April 17, 2026

    ओळख लपविण्यासाठी बुरखा घालून घरी नेत अत्याचार

    April 17, 2026

    राज्यात उष्णतेची लाट; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन

    April 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.