Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!
    • दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!
    • विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
    • मनोज पाटील, शरद शिंदे, विनोद तराळसह संशयितांचे जामीन फेटाळले!
    • शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा चिंतेचा विषय!
    • मराठी भाषा विभागाच्या सात संकेतस्थळांचे नव्या डोमेनवर स्थलांतर पूर्ण
    • ९ ऑगस्टला मोफत कायदेविषयक मार्गदर्शक शिबिर
    • फ्रीलांस करिअरच्या संधी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»आयएमएफ’च्या व्यवस्थापकीय संचालिका : डॉ. गीता गोपीनाथ
    ताज्या बातम्या

    आयएमएफ’च्या व्यवस्थापकीय संचालिका : डॉ. गीता गोपीनाथ

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 25, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    नव दुर्गा (महिला अर्थतज्ज्ञ)

    आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या इतिहासातही पहिल्या मुख्य अर्थतज्ज्ञ आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील ‘गीता’ असे ज्यांना संबोधिले जाते अश्या आपल्या आजच्या नव दुर्गा आहेत गीता गोपीनाथ.

     

    पार्श्वभूमी:

    गीता गोपीनाथ (जन्म 8 डिसेंबर 1971) एक भारतीय-अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आहे. कर्नाटकातील म्हैसूरमध्ये जन्मलेल्या आणि आता अमेरिकेच्या नागरिक असलेल्या गीता गोपीनाथ (वय ४७) सध्या हार्वर्ड विद्यापीठात ‘आंतरराष्ट्रीय अभ्यास आणि अर्थशास्त्र’ विषयाच्या प्राध्यापक आहेत. मॉरिस ऑब्सफेल्ड यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबर २०१८ रोजी संपल्यानंतर संस्थेच्या ११ व्या मुख्य अर्थतज्ज्ञ म्हणून गीता गोपीनाथ यांनी एक जानेवारी २०१९ रोजी पदभार स्वीकारला आहे. त्यांच्या नियुक्तीची घोषणा ऑक्टोबर महिन्यात करण्यात आली होती. याआधी रघुराम राजन यांनी हे पद भूषविले होते. ‘इंटरनॅशनल फायनान्स’ आणि ‘मॅक्रोइकॉनॉमिक्स’ हे गीता यांचे संशोधनाचे विषय आहेत. प्राथमिक शिक्षण म्हैसूरमध्ये, तर पदवीपर्यंतचे शिक्षण दिल्लीत पूर्ण केल्यानंतर गीता यांनी ‘दिल्ली स्कूल ऑफ इकनॉमिक्स’ मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी वॉशिंग्टन विद्यापीठात एमएची पदवी घेतली. २००१मध्ये त्यांनी प्रिन्स्टन विद्यापीठातून पीएचडी पूर्ण केली. त्यासाठी त्यांना वुड्रो विल्सन फेलोशिप रिसर्च अॅवॉर्ड मिळाला होता. त्या ‘अमेरिकन इकॉनॉमिक्स रिव्ह्यू’च्या सहसंपादक आणि ‘नॅशनल ब्यूरो ऑफ इकोनॉमिक रिसर्च’ मध्येही कार्यरत होत्या. २००१ ते २००५ या कालावधीत शिकागो विद्यापीठात सहायक प्राध्यापक म्हणून काम केलेल्या गीता २००५ पासून हार्वर्ड विद्यापीठात सहायक प्राध्यापक म्हणून रुजू झाल्या. याच विद्यापीठात पुढे त्यांची पदोन्नती होत गेली. गीता यांचे कुटुंब मूळचे केरळचे. केरळचे विद्यमान मुख्यमंत्री पिनरई विजयन यांच्या आर्थिक सल्लागार म्हणूनही गीता यांनी कार्यभार सांभाळला होता.

     

    महत्वपूर्ण कामगिरी :

    १९९० मध्ये चंद्रशेखर सरकार सत्तेत आल्यानंतर सरकारला सोने गहाण ठेवावे लागले होते. ही बातमी वाचून गीता गोपीनाथ यांना धक्का बसला होता, त्यांनी यानंतरच अर्थतज्ज्ञ होण्याचा निर्णय घेतला होता. गीता गोपीनाथ यांची ऑक्टोबर २०१८ मध्ये ‘आयएमएफ’ मध्ये मुख्य अर्थशास्त्रज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ‘आयएफएम’ चे पहिल्या उपव्यवस्थापकीय संचालक म्हणून पदोन्नती देण्यात आली होती. गीता गोपीनाथ यांनी वॉशिंग्टनस्थित जागतिक कर्जदाराच्या पहिल्या महिला मुख्य अर्थतज्ज्ञ म्हणून तीन वर्षे काम केले आहे. ‘आयएमएफ’ च्या प्रमुख पदी नियुक्ती होण्यापूर्वी गीता गोपीनाथ यांचे अनेक संशोधनपर लिखाण अनेक अर्थशास्त्र जर्नल्समध्ये प्रकाशित झाले आहे.

    ‘गीता या जगातील अव्वल अर्थतज्ज्ञांपैकी एक असून, त्यांना या विषयातील आंतरराष्ट्रीय स्तरावरचा मोठा अनुभव आहे. जगभरातील महिलांसाठी त्या ‘रोल मॉडेल’ आहेत, ’ असे ‘आयएमएफ’च्या व्यवस्थापकीय संचालिका ख्रिस्टिन लेगार्ड यांनी गीता यांच्याबद्दल म्हटले आहे. ‘डॉलर हा जागतिक अर्थकारणातील आणि व्यवहारातील महत्त्वाचा मुद्दा आहे. या अर्थकारणात डॉलरचे असलेले स्थान समजून घेण्यात आपल्याला रस असल्याचे गीता यांनी म्हटले आहे. तसेच अनेक देशांचे डॉलरमध्ये होणारे व्यवहार, त्याचा आंतरराष्ट्रीय व्यवहारांवर होणारा परिणाम आणि डॉलरची तूट भासल्यास त्याचा जागतिक अर्थकारणावर होणारा परिणाम हे आपल्या अभ्यासाचे विषय असतील, ’ असे गीता यांनी म्हटले आहे. महत्त्वाच्या धोरणविषयक प्रश्नांमध्ये बौद्धिक नेतृत्व करण्याची संस्थेची परंपरा पुढेही सुरू ठेवण्याचा प्रयत्न आपण करू, असे त्यांनी म्हटले आहे. ‘जागतिकीकरणामुळे काही प्रश्न उपस्थित झाले असून, त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. व्यापारामुळे जागतिक गरिबी कमी झाली असून, जीवनमान उंचावले आहे. तरीही असमानतेचा प्रश्न आणि नियमांमध्ये एकवाक्यता आहे का, या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची गरज आहे, ’ असे त्यांनी म्हटले आहे.

    आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) पहिल्या माजी मुख्य अर्थशास्त्रज्ञ आणि विद्यमान उपव्यवस्थापकीय संचालक गीता गोपीनाथ यांच्या नावावर एका विक्रमाची नोंद झाली आहे. तर हा विक्रम भारताची जगभरात मान उंचावणारा आहे. ‘आयएमएफ’च्या भिंतीवर लावलेल्या अर्थशास्त्रज्ञांच्या छायाचित्रांच्या रांगेत गीता गोपीनाथ यांचे छायाचित्र लावण्यात आले आहे. त्यासोबतच एका विक्रमाला त्यांनी गवसणी घातली आहे. ‘आयएमएफ’च्या भिंतीवर लावलेल्या अर्थशास्त्रज्ञांच्या छायाचित्रांच्या रांगेत छायाचित्र असण्याचा बहुमान मिळालेल्या त्या पहिला महिला अर्थशास्त्रज्ञ आणि दुसऱ्या भारतीय ठरल्या आहेत.

     

    डॉ. रिता मदनलाल शेटीया

    (लेखिका अर्थशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका आहेत.)

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!

    August 8, 2026

    दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!

    August 8, 2026

    विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

    August 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif