जळगावात 54 बेकायदेशीर सिलेंडर जप्त

मजुराच्या घराची केली तपासणी

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

जळगावसह जिल्ह्यात अवैध गॅस सिलेंडरचे अनेक काळेबाजार उघडकीस येत आहे. त्यातच जळगावातील रामेश्वर कॉलनीत राजपूत गल्लीत मजुराच्या घरातून एमआयडीसी पोलिसांना तब्बल ५४ गॅस सिलेंडर जप्त केले आहे. या प्रकरणी एका जणावर गुन्हा दाखल आहे.

रामेश्वर कॉलनीतील राजपूत गल्लीत राहणारा किरण भागवत पाटील (वय ५१, रा. घर नंबर ३५) यांच्या घराची तपासणी केली असता त्यात वेगवेगळ्या गॅस कंपनीचे घरगुती वापराचे तसेच व्यावसायिक गॅस सिलेंडर  व रिफिलिंगसाठी लागणारे साहित्य असा १,६४,००० रुपयांचा मुद्देमाल पोलिस पथकाने जप्त केल्याची माहिती पोलिस कॉन्स्टेबल योगेश घुगे यांनी दिली.

भारत गॅसचे २४ भरलेले व्यावसायिक सिलेंडर, १९ भरलेले घरगुती सिलेंडर, २ रिकामे व्यावसायिक सिलेंडर,  एचपीचे २ भरलेले व एक रिकामे घरगुती सिलेंडर,  इतर सहा भरलेले सिलेंडर, इलेक्ट्रॉनिक प्रेशर मोटर व त्याला जोडलेले दोन प्लास्टिक पाइप, नळीच्या टोकाला गॅस हंडीला जोडणारे लोखंडी सॉकेट, एक इलेक्ट्रॉनिक वजन काटा जप्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.