Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ओझरखेडा तलावामध्ये हतनूर धरणाचे पाणी!
    • TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक
    • मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय
    • वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा
    • राजस्थानमधील व्यापाऱ्याकडून सात लाखांची फसवणूक
    • पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड
    • खिडकीतून मण्यार आता घुसला अन् होत्याचे नव्हते!
    • भर पावसातली महाबळेश्वर पिकनिक थेट जीवावर बेतली
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»मध्यप्रदेशातून विदेशी दारूची अवैध वाहतूक उधळली
    गुन्हे वार्ता

    मध्यप्रदेशातून विदेशी दारूची अवैध वाहतूक उधळली

    वरोरा हद्दीत एलसीबीची धडक कारवाई, ५ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 1, 2026No Comments120 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

    मध्यप्रदेशातून चंद्रपूर जिल्ह्यात अवैधरित्या आणली जात असलेली विदेशी दारूची खेप स्थानिक गुन्हे शाखेने उधळून लावली. गोपनीय माहितीच्या आधारे चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वरोरा पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा नंदोरी टी-पॉइंट येथे धाड टाकून विदेशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या आरोपींना ताब्यात घेत मोठी कारवाई केली. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार कलम ६५ (ई) (अ) व ८३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    कारवाईदरम्यान पोलिसांनी २९ पेट्यांतील ३५३ विदेशी दारूच्या (७५० मिली) बाटल्या, वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली टोयोटा इटिओस जीडी (एमएच ०१ बीटी १०८७) कार तसेच तीन मोबाईल फोन असा एकूण ५ लाख १५ हजार ८५८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जप्त मुद्देमालामध्ये विदेशी दारूची किंमत १ लाख ८३ हजार ८५८ रुपये, टोयोटा इटिओस जीडी कारची किंमत ३ लाख रुपये, तर तीन मोबाईल फोनांची किंमत ३० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

    या प्रकरणी नरेंद्र जितेंद्र भाट (वय ३१, रा. जलनगर, चंद्रपूर) व सौ. दामिनी नरेंद्र भाट (रा. जलनगर, चंद्रपूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सूर्या उर्फ सूरज परसंगे (रा. जालनगर, चंद्रपूर) हा आरोपी फरार आहे. त्याचा पोलीस शोध घेत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष निपोनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. कारवाईत एपीआय बलराम झाडोकार, एचसी जयसिंग, संतोष येलपूलवार, गणेश भोयर, सचिन गुरनुले, विठ्ठल काकडे आणि गजानन मडावी यांनी सक्रिय सहभाग घेतला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक

    August 11, 2026

    मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय

    August 11, 2026

    वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा

    August 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif