लोकशाही न्युज नेटवर्क

एकीकडे घरगुती व व्यवसायासाठी वापरण्यात येणाऱ्या गॅस सिलेंडरचा तुटवडा असतांना पाचोरा शहरातील जारगाव चौफुली येथे एकाने त्याचे गोडावुन मध्ये अवैधरित्या घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडर साठवुन ठेवल्याने महसूल विभागाने याठिकाणी धाड टाकत ९ घरगुती व ९ व्यावसायिक गॅस सिलेंडर जप्त करत एका विरुद्ध पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पाचोरा महसूल विभागाचे प्रभारी पुरवठा निरीक्षक राहुल पवार हे २ मे रोजी दैनंदिन कामकाज करत असतांना त्यांना जारगाव चौफुली येथे अकबर मशिदखान याचे गोडावुन मध्ये अवैधरित्या बेकायदेशीर घरगुती व व्यवसायासाठी वापरण्यात येणाऱ्या गॅस सिलेंडरचा साठा करुन ठेवला असल्याची गोपनीय माहिती मिळाली असता राहुल पवार यांनी पाचोरा पोलिस स्टेशनचे पो. नि. राहुलकुमार पवार यांना माहिती दिली. प्रभारी पुरवठा निरीक्षक राहुल पवार, पुरवठा लिपीक शुभम सपकाळे व पो. हे. काॅ. राहुल शिंपी यांनी तात्काळ घटनास्थळी जावुन चौकशी केली असता पथकास अकबर मशिदखान यांचे गोडावुन मध्ये ३ हजार रुपये किंमतीचे ४ गॅस सिलेंडर व ३ हजार ६०० रुपये किंमतीचे १४ गॅस सिलेंडर आढळुन आल्याने पथकाने घटनास्थळाचा पंचनामा करत १८ गॅस सिलेंडर जप्त करत अकबर मशिदखान रा. जारगाव चौफुली, पाचोरा याचे विरुद्ध प्रभारी पुरवठा निरीक्षक राहुल पवार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


