Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिल्लीतील इमारत कोसळली; किती विद्यार्थी दबले गेले?
    • यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?
    • भुसावळ राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेत; सावकारे गटात अस्वस्थता!
    • बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!
    • दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली
    • महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा
    • नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»कृषी»चोपड्यात लाखोंचे अवैध बियाणे जप्त
    कृषी

    चोपड्यात लाखोंचे अवैध बियाणे जप्त

    शेतकऱ्यांना विनाबिलाने बियाणे विकण्याच्या तयारीत
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 23, 2026No Comments434 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    खरिपाचा हंगाम तोंडावर असतानाच जिल्ह्यात बियाणे माफियांनी आपले डोके वर काढले आहे. चोपडा तालुक्यातील चुंचाळे शिवारात शासनाने प्रतिबंधित केलेले आणि शेतकऱ्यांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने साठवून ठेवलेले सुपरकिंग वाणाचे तब्बल 5 लाख 40 हजार रुपये किमतीचे एचटीबीटी कापूस बियाणे कृषी विभागाने धाड टाकून जप्त केले आहे. याप्रकरणी बियाणे माफिया नितीन नंदलाल चौधरी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, या कारवाईमुळे अवैध बियाणे विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

    प्राप्त माहितीनुसार दि. 20 एप्रिल रोजी पहाटे दोन वाजेच्या सुमारास चोपडा तालुक्यातील चुंचाळे शिवारातील आरोपी नितीन चौधरी याच्या शेतात ही कारवाई करण्यात आली. बियाणे निरीक्षक तथा तालुका कृषी अधिकारी रामचंद्र मिठाराम पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कृषी विभागाने सापळा रचला होता. यावेळी 9 गोण्यांमध्ये भरलेले 450 ग्रॅम वजनाचे एकूण 450 पाकिटे आढळून आली. या पाकिटांवर कोणत्याही उत्पादकाचे नाव, बॅच नंबर किंवा अधिकृत पत्ता नव्हता.

    जप्त करण्यात आलेल्या सुपरकिंग वाणाच्या प्रत्येक पाकिटाची किंमत 1200 रुपये लावून आरोपी शेतकऱ्यांना विनाबिलाने हे बियाणे विकण्याच्या तयारीत होता. शासनाने अशा प्रकारच्या वाणांवर बंदी घातली असतानाही, केवळ अधिक नफा कमावण्यासाठी बियाणे माफिया शेतकऱ्यांची दिशाभूल आणि फसवणूक करत असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.

    याप्रकरणी तालुका कृषी अधिकारी रामचंद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून आरोपी नितीन नंदलाल चौधरी याच्याविरुद्ध चोपडा शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 316, 318सह बियाणे नियंत्रण आदेश 1983 आणि पर्यावरण संरक्षण कायदा 1986 च्या कलम 7 व 8 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाईत 5 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नसली तरी, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास चोपडा शहर पोलीस स्टेशनचे सपोनि एकनाथ भिसे हे करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला

    September 7, 2026

    यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?

    September 7, 2026

    स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन

    September 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif