अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले; २ जणांवर गुन्हा दाखल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीचे प्रमाण वाढतच आहे. शहरातील विद्यूत कॉलनी परिसरातून अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर रामानंदनगर पोलिसांनी पकडले असून याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील विद्युत कॉलनी परिसरातून ट्रॅक्टर (एमएच १९, एएन १९८७) आणि विना नंबरची ट्रॉलीतून विनापरवाना वाळूची वाहतूक करत असताना बुधवार ६ एप्रिल रोजी पहाटे ३ वाजता गस्तीवर असलेले रामानंदनगर पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचाऱ्यांनी पकडले. वाळू वाहतूकीबाबत कागदपत्रांची मागणी केली असता वाहतुकीचा कोणताही परवानगी नसल्याचे ट्रॅक्टर चालकाने सांगितले.

रामानंदनगर पोलिस ठाण्यात वाळूने भरलेले ट्रॅक्टर व ट्रॉली पोलीसांनी जप्त केली आहे. पोलिस उपनिरीक्षक गोपाल देशमुख यांच्या फिर्यादीवरून बुधवार ६ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता रामानंदनगर पोलिस ठाण्यात ट्रॅक्टर चालक राजेंद्र सोनवणे रा. खेडी कढोली ता.जि.जळगाव आणि प्रभाकर सोनवणे रा. रिंग रोड जळगाव या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस नाही जितेंद्र तावडे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.