विवरा नजिक अवैध वाळूचे ट्रॅक्टर जप्त; महसूल विभागाची कारवाई

गौण खनिजाची होतेय लूट : कारवाईची वाढवण्याची मागणी

0

 

लोकशाही न्यूज नेटवर्क

रावेर तालुक्यातील विवरा नजिक अवैध वाळू वाहतूक करीत असतांना ट्रॅक्टर ट्रॉली महसूल विभागाने जप्त केली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.रावेर तालुक्यात अवैध वाळू सैराट सुटले असून अपेक्षित कारवाया होत नसल्याने नाराजी आहे.आता याकडे जिल्हाधिकारी रोहन घुगे सरांनीच लक्ष देण्याची मागणी होत आहे.

रावेर तालुक्यात अवैध गौण खनिज बाबत तहसिलदार संजय तायडे यांच्या तासाई नंतर महसूल प्रशासन शुद्धीवर आले.एका पाठोपाठ एक अश्या दोन दिवसात दोन कारवाया झाल्या आहे. कारवाई बाबत ढिलाई बघता तहसीलदार संजय तायडे यांनी महसूल पथकाला फिल्डवर कारवाई करा ढिलाई खपवून घेतली जाणार नाही असा स्पष्ट संदेश महसूल पथकाला दिला आहे.

आज विवरा नजिक अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टरची गुप्त माहिती महसूल पथकाला मिळाली. यावेळी मंडळाधिकारी यासिन तडवी, निलेश धांडे, सुषमा घरडे, ग्राम महसूल अधिकारी कैलास चव्हाण भारत वानखेडे कमलाकर हटकर प्रशांत जाधव भूषण कांबळे सुधीर इंगळे यांनी या ट्रॅक्टर ट्रॉली छापा टाकत कारवाई केली आहे. रावेर तालुक्यातून भोकर नदी, सुकी नदी, तापी नदी, अनेक शासकीय मुरुम बर्डी असून यातून दररोज हजारो ब्रास अवैध गौण खनिजाची लूट होतें याकडे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.