भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
भडगाव तालुक्यात व शहरात सध्या गिरणा नदी पात्रातील अवैध वाळू वाहतूक हा संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत असून यावर सतत कारवाई करून सुद्धा वाळूमाफिया हे गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू उत्खनन सुरूच ठेवत आहेत यावर आज सकाळी चाळीसगाव विभागीय पोलीस अधिकारी राजेश चंदेल यांच्या पथकातील पो.हे.कॉ. संभाजी पाटील, रवींद्र पाटील, राजेंद्र निकम व ज्ञानेश्वर बडगुजर यांनी कारवाई केली यावेळी डंपर ड्रायवर अनिल मलखन वंजारी रा. पळसखेडे व ढंपर मालक रविंद्र पवार रा. पेठ भडगाव हे आहेंत अशी माहिती पथकाने दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की भडगाव तालुक्यात व भडगाव शहरात गिरणा नदी पात्रातून दररोज 50 ते 60 डंपर व शेकडो ट्रॅक्टर हे अवैध वाळू वाहतूक करतात यावर गेल्या दोन महिन्यांपासून भडगाव महसूल विभागाने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचललेला आहे व तो बडगा कायम सुरू राहणार आहे. यातच आज सकाळी चाळीसगाव विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश चंदेल यांच्या पथकाने सकाळीं पाच वाजता वलवाडी गावाच्या दरम्यान डम्परांवर कारवाई केली. अवैध वाळू वाहतुकीचे येथीलही डंपर पोलीस स्टेशन येथे जप्त करण्यात आले असून ते पुढील कारवाईसाठी भडगाव महसूल विभागाकडे वर्ग करण्यात आले असून गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.