Thursday, August 11, 2022

गॅस सिलेंडरची अवैधरित्या विक्री; तरुण अटकेत

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

जळगाव शहरातील एस.टी. वर्कशॉपसमोर अवैधरित्या गॅस सिलिंडरची विक्री करणाऱ्या तरुणाला शनिपेठ पोलिसांनी अटक केले आहे. यावेळी पोलिसांनी गॅस भरण्याची मोटार, तीन सिलेंडरसह, इलेक्ट्रीक वजन काटा असा १२ हजार ५१० मुद्देमाल जप्त केला आहे.

- Advertisement -

- Advertisement -

मंगेश सुरेश कुंवर (वय ३६ रा. लक्ष्मणभाऊ नगर, एसटी, वर्कशॉपसमोर जळगाव) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. हा तरुण एस.टी.वर्क शॉपसमोर अवैधपणे गॅस सिलेंडर भरुन व्यावसायिक कारणासाठी त्याची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक बळीराम हिरे यांना मिळाली.

मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, कर्मचाऱ्यांच्या पथकाने सोमवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी २ हजार ९१० रुपयांचे भरलेले सिलेंडर, ४ हजार रुपयांचे दोन अर्धवट भरलेले सिलेंडर, गॅस भरण्याची इलेक्ट्रीक मोटार, इलेक्ट्रीक वजन काटा असा १२ हजार ५१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

संशयित मंगेश कुंवर यास अटक करण्यात येवून त्याच्याविरोधात शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक सुरेश सपकाळे हे करीत आहेत.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या