Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • एमपीएससी परीक्षेबाबत दुसरे जंतर-मंतर आंदोलन करणार!
    • मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट
    • परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज
    • ब्रिक्स : सांस्कृतिक संवादातून जागतिक एकात्मतेच्या नव्या पाऊलखुणा
    • पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू
    • आत्मसमर्पण टाळण्यासाठी ५ कोटी रुपये जमा करा!
    • विजय थलपती विरोधात विरोधक एकवटले
    • तुरुंगात गेल्यावर मला विपश्यनेलाच आल्यासारखं वाटलं
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»पिंपळे खुर्द धरणातून बेकायदा मुरूम उत्खनन; जेसीबीसह डंपर जप्त
    गुन्हे वार्ता

    पिंपळे खुर्द धरणातून बेकायदा मुरूम उत्खनन; जेसीबीसह डंपर जप्त

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 30, 2026No Comments60 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

    तालुक्यातील पिंपळे खुर्द येथील धरणाच्या शासकीय जागेतून जेसीबीच्या साहाय्याने बेकायदेशीररीत्या मुरूम खोदून डंपरमधून वाहतूक करताना अमळनेर पोलिसांनी दोघांना रंगेहाथ पकडले. या कारवाईत जेसीबी आणि डंपरसह एकूण १८ लाख ११ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

    याबाबत अधिक माहिती अशी की, पिंपळे खुर्द धरणाच्या शासकीय जागेतून बेकायदेशीररीत्या गौण खनिजाचे उत्खनन करून त्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांना मिळाली. त्यांनी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी हेडकॉन्स्टेबल विनोद भोई, विनोद संदानशिव, सिद्धांत शिसोदे आणि सागर साळुंखे यांना घटनास्थळी पाठविले.

    पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले असता जेसीबी क्रमांक एमएच ५४ बी १३२९च्या साहाय्याने धरणाच्या जागेतून मुरूम खोदण्यात येत असल्याचे आढळून आले. तसेच डंपर क्रमांक एमएच ४७ ई ३३०६मध्ये मुरूम भरला जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी डंपरचालकाकडे चौकशी केली असता त्याने आपले नाव प्रकाश कन्हैयालाल पाटील (वय ४५, रा. वाघोदे) असे सांगितले. तर जेसीबी चालकाने आपले नाव परेश दिलीप पाटील (वय २५, रा. सप्तशृंगी कॉलनी) असे सांगितले. दोघांकडे मुरूम उत्खनन व वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याचे आढळून आले.

    पोलिसांनी कारवाई करत ८ लाख ११ हजार ९२० रुपये किमतीचा डंपर आणि १० लाख रुपये किमतीचे जेसीबी मशीन असा एकूण १८ लाख ११ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलीस कर्मचारी सिद्धांत शिसोदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रकाश कन्हैयालाल पाटील आणि परेश दिलीप पाटील यांच्याविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम ३०३ (२), ३०५ (ई) आणि ६२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल काशिनाथ पाटील करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट

    September 9, 2026

    परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज

    September 9, 2026

    पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू

    September 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif