भोरटेक गिरणा पात्रातून वाळूचा अवैध उपसा

टीप्पर महसूल विभागाच्या ताब्यात

0

भडगाव – तालुक्यातील भोरटेक येथील गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक करतांना अवि संजय पाटील याचे मालकीचे एक टाटा 909 टिप्पर वर महसूल विभागाच्या पथकाने कारवाई केली. अवैध वाळू वाहतुकीचे टीप्पर भडगाव तहसील कार्यालय येथे जमा करण्यात आले आहे. यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल अशी माहिती महसूल सहाय्यक महादू कोळी यांनी दिली. ही कारवाई तहसीलदार शितल सोलाट यांच्या मार्गदर्शनाखाली पथक ग्राम महसूल अधिकारी व्ही.सी.पाटील, विलास शिंदे, मांडोळे, अविनाश जंजाळे, बैरागी, शितल राजपूत, महसूल सेवक नितीन मोरे, कविता सोनवणे आदींच्या पथकाने कारवाई केली. गिरणा नदी पात्रातून दिवसेंदिवस वाळूचा अवैध वाहतुकीचा मोठ्या प्रमाणावर उपसा होत असून कारवार्इत सातत्य ठेवावे अशी मागणी होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.