चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

गत अनेक महिन्यांपासून अवैध धंदेवाले मूल तालुक्यात जास्तीत जास्त फोफावले असल्याचे विदारक चित्र काही दिवसांपासून दिसत होते. तालुक्यातील परीसरात अवैध व्यवसायातून आलेला अमाप पैसा, त्यांतून व्हाईट कॉलरमुळे स्वतःला पुढारी समजणाऱ्या गावगुंडाची दहशत तालुक्यात कमी झाल्याची खमंग चर्चा सुरू आहे.
मूल तालुक्यात गत अनेक महिन्यांपासून बेकायदेशीर रितीने गब्बर झालेल्या व अवैध व्यवसाय करणाऱ्या भाई लोकांच्या मानगुटीवर महाराष्ट्र पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांची धडक मोहीम सुरु झाली असून मूल तालुका वासियांच्या मनात पुढील काही काळ तरी सुव्यवस्थेबाबत शंका उरलेली नाही, असे चित्र निर्माण झाले आहे.
मपोसे अधिकारी प्रमोद चौगुले हे तिन महिन्यांकरीता परिविक्षाधीन अधिकारी म्हणून मुल पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारला असता त्यांनी अवैध धंद्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारुन अवैध व्यवसाय विरोधात खाकीचा धाका कायम केला. कमीतकमी पुढील अडीच महिने तरी त्रास होणार नसल्याचे नागरीकांत बोलले जात आहेत.
गेल्या चार महिन्यांत मूल तालुका ‘अवैध रेती चोरांचे माहेरघर’ म्हणून प्रसिद्धीस आला असल्याने हे सर्वश्रूत आहे. ज्या क्षेत्रात खुलेआम भोकसा भोकाशी होत असते, त्या श्रेत्रात इतर अवैध धंद्यांची झाडासारखी मुळे जमीनीत घट्ट रुजलेली असतात व मूल तालुक्यात अशीच परिस्थिती असताना पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या गत पंधरवाड्यातील ‘अंदर डालो’ मोहिमेने मूल तालुक्यात जरा सुव्यवस्थेची सुरवात अनुभवाला मिळेल असे जाणकार बोलताना दिसत आहेत.
गत काही महिन्यांपासून मूल शहर चरस, गांजा, सट्टा, अवैध दारू विक्रीचे मार्केटच निर्माण झाले आहे. याशिवाय अवैध रेती, अवैध खनिज वाहतूक, अवैध गो वाहतूक, चोरी, अवैध प्रवासी वाहतूक संपुर्ण तालुक्यात विस्तारली आहे, मूल तालुक्यातील अनेक गुन्हेगारी घटनांमध्ये स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांचा थातूरमातूर कारवाया झाल्या पण जैसै-थे. मूल पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे शाखेचे खास पथक अनेक वर्षांपासून काही “खास” लाेकांच्या दावणीला बांधला आहे का? हा सवाल कायम आहेच.
अशा बेकायदेशीर धंद्याच्या विळख्यात कायदा व सुव्यवस्था ढासळण्याच्या मार्गावर असलेल्या मूल तालुक्याला पुढील काही महिने शांत वातावरणात जगण्याची संधी पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या अवैध व बेकायदेशीर धंद्याविरोधी कारवाईने मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. तसेच प्रमोद यांनी परिविक्षाधीन अधिकारी म्हणून मूल तालुका पोलीस स्टेशन रूजू होतच काही दिवसातच अवैध व बेकायदेशीर धंद्याविरारोधी अभियान सुरू करून मूल तालुक्यातील जनतेला शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित केल्याचे सुज्ञ नागरीकांत बोलले जात आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई जिल्हा शाखा तालुका शाखा तर्फे पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांची भेट घेऊन अभिनंदन करण्यात आले व तालुक्यातील सुव्यवस्था साम्बंधर संवाद साधण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई, जिल्हा शाखा चंद्रपुर अध्यक्ष तथा दैनिक लोकशाही जिल्हा प्रतिनिधी शंकर बोरघरे, मुल तालुका अध्यक्ष सतिश राजूरवार, भद्रावती तालुका अध्यक्ष शाम चटपल्लीवार, निशांत देवगडे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश माकोडे, रूपेश मांढरे उपस्थित होते.
आपण जोपर्यंत इथे परिविक्षाधीन अधिकारी म्हणून काम करणार आहोत तेव्हापर्यंत अवैध व बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे अभियान सुरू ठेवून मूल तालुक्यातील जनतेच्या हिताचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांनी दिली.


