Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    • हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!
    • दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»राजकारण»अजित पवारांचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर आमच्या सोबत या!
    राजकारण

    अजित पवारांचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर आमच्या सोबत या!

    शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवारांना थेट आवाहन
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 13, 2026No Comments195 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं आवाहन केलं आहे. “अजित पवारांचे स्वप्न जर पूर्ण करायचे असेल तर पवार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे अजित दादांच्या पक्षाने आमच्या सोबत यावे” असं शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला आवाहन केलं आहे. “अजितदादांच्या कुटुंबावर आम्ही कधी टीका केली नाही. अजित दादांच्या कुटुंबाला अपमानास्पद वाटेल असं आम्ही काही केलं नाही” असं शशिकांत शिंदे म्हणाले.

    शशिकांत शिंदे यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का? ही चर्चा सुरु झाली आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी आम्ही कुणासोबतही जाणार नाही. हवं असेल तर त्यांनी आमच्यासोबत यावं असं म्हटलं होतं. शरद पवार यांनी एकप्रकारे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणांच्या चर्चांना पूर्णविराम दिला होता. शशिकांत शिंदे यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा ही चर्चा सुरु होणार आहे.

    नुकतीच सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पार पडली. त्यानंतर पुन्हा एकदा विलिनीकरणाची चर्चा सुरु झाली आहे. इथे पवार विरुद्ध पवार असाच सामना होता. निवडणुकीत सुनेत्रा पवार आणि युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली पॅनल उभं करण्यात आलं होतं. यात युगेंद्र पवार यांच्या पॅनलकडे शरद पवारांचं पॅनल म्हणूनच पाहिलं जात होतं. या प्रतिष्ठेच्या लढाईत सुनेत्रा पवार यांच्या पॅनलने बाजी मारत 21 पैकी 21 जागा जिंकल्या.

    दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हयात असताना दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर चर्चा झाल्याचे वारंवार दावे करण्यात आले. पण अजितदादांच्या निधनानंतर ही चर्चा मागे पडली. अजित दादांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? यावर दोन्ही बाजूंनी बरीच वक्तव्य झाली. पण एकत्र येणं दोन्ही बाजूच्या नेतृत्वाच्या मनात नसल्याचं स्पष्ट झालं. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस भाजपं प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सहभागी होणार अशी सुद्धा काही महिन्यापूर्वी चर्चा होती. पण या नुसत्या चर्चाच ठरल्या. तीन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडले. एक गट केंद्रात आणि राज्यात भाजपसोबत आहे. दुसरा गट शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षात आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान

    November 8, 2026

    15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार

    November 8, 2026

    कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ

    November 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif