Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिल्लीतील इमारत कोसळली; किती विद्यार्थी दबले गेले?
    • यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?
    • भुसावळ राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेत; सावकारे गटात अस्वस्थता!
    • बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!
    • दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली
    • महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा
    • नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राजकारण»छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्यास त्यांना..
    राजकारण

    छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्यास त्यांना..

    संजय गायकवाडांचा इशारा : बुलढाण्यात वातावरण तापले
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 28, 2026No Comments167 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून वातावरण तापले आहे. प्रकाशक प्रशांत आंबी यांनी संवैधानिक पद्धतीने आमदार संजय गायकवाड यांच्या घरावर मोर्चा काढणार असल्याचे म्हटले आहे. पुरोगामी संघटनांचे कार्यकर्ते या पुस्तकाचे वाचन करणार आहेत. तर छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्यास त्यांना बघू असा सज्जड इशारा गायकवाड यांनी दिला आहे. त्यामुळे दोन्ही गट आमने-सामने आल्यास मोठा राडा होण्याची शक्यता आहे. आज बुलढाण्यात वातावरण तापले आहे.

    पोलिसांनी आमच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली. त्यांचा ही कार्यक्रम पोलिसांनी रद्द केला. तरीही राज्यातील तमाम शिवभक्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याकरीता जाणून बुजून जे पुस्तक तुम्ही छापलं. 20 लाख प्रति विकल्या. असे असतानाही तुम्हाला इथं येऊन पुस्तक वाचण्याची आवश्यकता काय आहे. ते जर पुस्तक वाचायला येतील तर मग आम्ही पुस्तक वाचायला जाणार. आम्ही त्या कार्यक्रमात समोर खाली बसणार. आम्ही विनयशीलतेने सर्व काही ऐकणार आणि त्यामध्ये जर त्यांनी पुस्तक वाचताना छत्रपती शिवराय असा उल्लेख केला तर आम्ही टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत करणार. पण जर त्यांनी महाराजांचा एकेरी उल्लेख केला आणि त्या ठिकाणी शिवभक्तांच्या भावना अनावर झाल्या तर याची जबाबदारी त्या आयोजकांची अथवा पुस्तक वाचणाराची असेल असा सज्जड इशारा आमदार संजय गायकवाड यांनी दिला.

    कोल्हापूरचा लांडगा इथं येईल आणि कोल्हेकुई करेल. नाहक कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करेल, छत्रपती शिवरायांचा अपमान होईले, असे त्या मंडप मालकाला वाटलं. त्यामुळे त्याने स्वत:च मंडप काढून नेला, असा दावा गायकवाड यांनी केला. प्रकाशक प्रशांत आंबी यांच्यावरही भावना भडकवल्याचा 505 ब गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. तर पुरोगामी गटाने आयोजित केलेल्या मंडपात आम्ही सुद्धा पुस्तक वाचणं करणार असे संजय गायकवाड म्हणाले. आता तमाशा आणि नाटकं कशाला करता असा सवालही त्यांनी केला.

    या सर्व विषयात छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी करण्यात आली आहे. महाराजांचा खोटा इतिहास लिहितात. या पुस्तकात 300-400 वेळा त्यांनी शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला आहे. एकाठिकाणी या पुस्तकात औरंगजेबाला औरंगजेबजी म्हटले आहे तर शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला आहे असा आरोप गायकवाड यांनी केला आहे. त्यांनी यावेळी आमदार रोहित पवार यांच्यावरही तोंडसुख घेतले. ते हिरोगिरी करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला

    September 7, 2026

    यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?

    September 7, 2026

    बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!

    September 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif