लोकशाही न्यूज नेटवर्क

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी काल जेनजीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी तरुणांच्या भावनांचे स्वागत केलं. तसेच हे तरुण अधिक प्रामाणिक असल्याचं म्हटलं आहे. भागवत यांच्या या जेनजीशी झालेल्या संवादावरून ठाकर गटाचे नेते संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. जेनजींशी संवाद असला पाहिजे हे मोहन भागवत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना सांगितले पाहिजे. तसेच हिंमत असेल आणि ताकद असेल तर संघाने आधी अमित शाहांचा राजीनामा घेतला पाहिजे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
मध्यामंशी संवाद साधताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि संघाला चांगलंच डिवचलं आहे. सरसंघचालकांनी जेनजींशी संवाद असला पाहिजे हे नरेंद्र मोदी आणि अमित शहांना सांगितलं पाहिजे. संघाचे एक नेते अतुल लिमये असे म्हणतात की, जेन-जी देशविरोधी आहेत. आणि अमित शहांचंही तेच म्हणणं आहे. जेन-जींवर गोळ्या चालवण्यात आल्या. संघाची इतकी ताकद असेल आणि नैतिक पाठबळ असेल तर त्यांनी आधी अमित शहांचा राजीनामा मागावा, असं संजय राऊत यांनी म्हटलं पाहिजे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा संसदेत या विषयावर भाष्य करायला तयार नाहीत. अमित शहा म्हणतात, ही पोरं भरकटलेली आहेत. आणि भाजपची मातृसंस्था म्हणते ही पोरं आमची आहेत. आम्ही काय नक्की समजावं?, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.


