लोकशाही न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यातील दुचाकी वाहन चालकाविरुद्ध होणार आता हेल्मेट न परीधान करून चालवणार गाडि तर कारवाई, दुचाकि वाहन चालकांचे अपघाताचे प्रमाण वाढत असून मृत्यूमुखी पडणाऱ्या अनेक दुचाकी स्वारांची हेल्मेट परिधान न करता वाहन चालविणे हे मोटार वाहन कायदा- १९८८- कलम १२९ अन्वये गुन्हा असतांनी जानेवारी ते नोव्हेंबर २०२४ पर्यंत ३८४ दुचाकीस्वार विना हेल्मेट मृत्युमुखी झाले असता १८४ गंभीररित्या जखमी असल्याची पोलिस सूत्रांनी माहीती दिली.
चंद्रपूर वाहतूक पोलिसांचा हेल्मेट न परीधान करून दुचाकीवरून प्रवास करित असतांना कारवाई करने हा उद्देश नसून अपघाताचे प्रमाण कमी करून मूतृदर कमी करणे असा आहे.
यावेळी चंद्रपूर जिल्ह्य़ातील सर्व वाहतुक नियंत्रण शाखा पोलिसांनी आता विना हेल्मेट परिधान करून दुचाकीस्वारांवर विषेश मोहीम राबवून सात ते आठ दिवसांत ४ हजार ३०० तर चंद्रपूर वाहतूक शाखा यांनी ४ हजार ३९३, पोलिस स्टेशन यांनी ८०७, विसापूर येथील टोलनाका परिसरातील वाहतूक पोलिसांनी १०९७ दुचाकीस्वारांव कडक कारवाई करण्यात आली.
या दरम्यान अनेक नागरीकांनी अशा कारवाई कालावधीत पूर्व सूचना आपल्या विभागाकडून देण्यात याव्या जेणेकरून नाहक त्रास होणार होनार पण प्रसार माध्यमातून प्रसिद्ध पत्रकाद्वारे माहीती देऊन सुध्दा बरेच नागरीक विना हेल्मेट दुचाकी प्रवास करीत असल्याने मोठ्या प्रमाणात अपघात झाले. असल्याने नागरिक सुरक्षा उद्देशाने सदर विना हेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई ची मोहीम राबविण्यात येणार असल्याची पोलिस सुत्रांनी माहीती दिली.
तरी सर्व नागरीकांनी या पुढे दुचाकी चालवितांना हेल्मेट परिधान करावे. चंद्रपूर जिल्ह्य़ातील अपघाताचे वाढते प्रमाण पाहता सर्व वाहतुक नियमांचे पालन करणे गरजेचे व दुचाकीस्वारांना हेल्मेटचा वापर करावा या बाबत जिल्ह्य़ातील सर्व जनतेला पोलिस निरीक्षक प्रविण पाटील यांनी आवाहन केले आहे.