रिपोर्ट जर थातूर मातूर दिला तर… : थेट इशारा

रोहित पवारांनी दिला सज्जड दम : अहवालावर लक्ष

0

 

लोकशाही न्यूज नेटवर्क

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यांनी अजितदादांचा विमान अपघात की घातपात आहे याविषयी त्यांनी राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली. राज ठाकरे यांनी त्यांच्याकडून या अपघाताविषयी आणि रोहित पवार यांच्या मनातील शंका समजावून घेतली. राज ठाकरे या विषयाला न्याय देणार आहेत. राज्यातील जनता दादाला न्याय देणार आहे, असे रोहित पवार म्हणाले. तर अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी प्राथमिक अहवाल सादर होणार आहे. हा अहवाल आज अथवा उद्या येईल. त्याविषयी रोहित पवार यांनी सज्जड दम दिला आहे.

अजितदादांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल आज अथवा उद्या येण्याची शक्यता आहे. उद्या अजितदादांच्या विमान अपघाताला एक महिना पूर्ण होईल. याविषयी रोहित पवार यांनी माहिती दिली. मुरलीधर मोहोळ म्हणाले एक महिन्यापूर्वी अहवाल येईल. उद्या एक महिना पूर्ण होणार आहे. त्यामुळे तुमचा एक महिना कधी येणार आणि रिपोर्टमध्ये काय असेल ते बघू. मी सोमवारी पीसी घेऊन त्यावर बोलणार आहे. खरा रिपोर्ट काय असतो ते सांगतो. थातूरमातूर रिपोर्ट दिला तर महाराष्ट्रातील जनता सोडणार नाही. आम्ही थातूरमातूर रिपोर्ट खपवून घेणार नाही, असा मोठा इशारा रोहित पवार यांनी दिला. त्यामुळे या अहवालावरून गोंधळ उडण्याची शक्यता आहे.

आम्ही ज्यांच्याबद्दल एफआयआर करणार आहोत. एफआयआर झाला तर त्यात चौकशी करावीच लागते. म्हणून एफआयआर झाला पाहिजे. नाही घेतला तर क्रिमिनिल तपास होणार नाही. फक्त अपघाताची चौकशी होईल. म्हणून आमचा प्रयत्न आहे, असे रोहित पवार म्हणाले.

अजितदादांच्या विमान अपघाताप्रकरणी रोहित पवार हे सातत्याने संशय व्यक्त करत आहेत. याविषयावर त्यांनी तीन पत्रकार परिषद घेतल्या. त्यात त्यांनी काही पुरावे सादर केले. वैमानिकाच्या मदतीने हे विमान आदळल्याचा दावा त्यांनी केला. तर DGCA वर आपल्याला शंका आहे. व्हीएसआर शी असलेले केंद्रीय मंत्र्यांचे संबंध आणि अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही रोहित पवार यांनी यापूर्वी केला आहे. त्यामुळे या विमान अपघाताविषयी जनतेच्या मनातही संभ्रम आहे. हा विमान अपघात होता की घातपात होता याविषयी सोशल मीडियावर मोठी चर्चा झडत आहे.

दरम्यान या विमान अपघातप्रकरणी जो प्राथमिक अहवाल येणार आहे, त्याकडे जनतेचे लक्ष आहे. हा चौकशी अहवाल थातूरमातूर देऊ नका, तो सविस्तर यावा अशी अपेक्षा रोहित पवार यांनी व्यक्त केली. अजितदादांच्या अपघातप्रकरणी प्राथमिक अहवाल आज येणार की उद्या याची अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. Aircraft Accident Investigation Bureau (AAIB) हा अहवाल सादर करणार आहे. एएआयबी DGCA कडे हा अहवाल सादर करणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.