Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • एमपीएससी परीक्षेबाबत दुसरे जंतर-मंतर आंदोलन करणार!
    • मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट
    • परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज
    • ब्रिक्स : सांस्कृतिक संवादातून जागतिक एकात्मतेच्या नव्या पाऊलखुणा
    • पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू
    • आत्मसमर्पण टाळण्यासाठी ५ कोटी रुपये जमा करा!
    • विजय थलपती विरोधात विरोधक एकवटले
    • तुरुंगात गेल्यावर मला विपश्यनेलाच आल्यासारखं वाटलं
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»तापीपुलावर भीषण अपघात : डंपरच्या धडकेत आई-मुलाचा मृत्यू, वडील व दुसरा मुलगा गंभीर
    उत्तर महाराष्ट्र

    तापीपुलावर भीषण अपघात : डंपरच्या धडकेत आई-मुलाचा मृत्यू, वडील व दुसरा मुलगा गंभीर

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 1, 2025No Comments3 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    तापीपुलावर भीषण अपघात : डंपरच्या धडकेत आई-मुलाचा मृत्यू, वडील व दुसरा मुलगा गंभीर

    जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव-चोपडा मार्गावरील विदगावजवळील तापी नदीच्या पुलावर मंगळवारी रात्री साडेदहा वाजता झालेल्या भीषण अपघातात आई व मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर वडील व दुसरा मुलगा गंभीर जखमी झाला. भरधाव वेगाने आलेल्या वाळूच्या डंपरने कारला जोरदार धडक दिल्याने कार थेट नदीपात्रात कोसळली.

    या भीषण अपघातात मीनाक्षी नीलेश चौधरी (रा. विठ्ठल नगर) आणि त्यांचा मुलगा पार्थ (वय १२) यांचा मृत्यू झाला. तर नीलेश प्रभाकर चौधरी (वय ३६) व ध्रुव (वय ४) हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघात इतका भीषण होता की क्षणभरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले.

    चौधरी कुटुंब देवीच्या दर्शनासाठी चोपडा येथे गेले होते. परतताना विदगाव येथील तापीपुलावर हा अपघात झाला. धडक इतकी जोरदार होती की कार नियंत्रण सुटून थेट नदीपात्रात कोसळली. अपघातानंतर वाळूने भरलेला डंपर पुलावर आडवा उभा राहिल्याने वाहतूकही ठप्प झाली.

    शिक्षक दांपत्यावर काळाचा घाला
    नीलेश चौधरी हे धानोरा शाळेत शिक्षक आहेत, तर मयत मीनाक्षी चौधरी या शिवाजीनगरमधील शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. शिक्षकी पेशात कार्यरत असलेल्या दांपत्यावर काळाने अक्षरशः घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

    #crime accident dumper car jalgaon Tapi river pool
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट

    September 9, 2026

    परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज

    September 9, 2026

    पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू

    September 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif