Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिल्लीतील इमारत कोसळली; किती विद्यार्थी दबले गेले?
    • यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?
    • भुसावळ राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेत; सावकारे गटात अस्वस्थता!
    • बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!
    • दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली
    • महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा
    • नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राष्ट्रीय»१३ वर्षांनंतर अचानक IAS अधिकाऱ्याचा राजीनामा
    राष्ट्रीय

    १३ वर्षांनंतर अचानक IAS अधिकाऱ्याचा राजीनामा

    सोशल मीडियावर लिहिलेली भावुक पोस्ट आली चर्चेत
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 30, 2026No Comments439 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    आयआयटी दिल्ली आणि आयआयएम बंगळुरूमधून शिक्षण पूर्ण करून प्रशासकीय सेवेत आलेल्या प्रसिद्ध महिला आयएएस अधिकारी दिव्या मित्तल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तब्बल १३ वर्षांच्या यशस्वी आणि उल्लेखनीय सेवेनंतर त्यांनी स्वेच्छेने हा निर्णय घेतला आहे. राजीनाम्याची घोषणा करताना त्यांनी सोशल मीडियावर लिहिलेली एक भावुक पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होत असून, नेटकऱ्यांकडून त्यांच्या निर्णयावर आणि सेवेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

    दिव्या मित्तल यांनी आपल्या पोस्टमध्ये त्यांच्या प्रवासाचा उल्लेख केला आहे. एक सामान्य कुटुंबातून येत त्यांनी आयआयटी आणि आयआयएम सारख्या देशातील सर्वोच्च संस्थांमधून शिक्षण घेतले. यानंतर त्यांना लंडनमध्ये उच्च पगाराची नोकरी मिळाली होती. मात्र, आपल्या देशाची माती आणि देशसेवेचे ऋण फेडण्याच्या ध्येयाने त्यांनी परदेशातील ती आलिशान नोकरी सोडून भारतात परतण्याचा निर्णय घेतला आणि त्या ‘आयएएस’ (IAS) अधिकारी बनल्या.

    आपल्या १३ वर्षांच्या कार्यकाळातील आठवणींना उजाळा देताना त्यांनी लिहिले की, देवरिया आणि मिर्झापूर सारख्या जिल्ह्यांमध्ये काम करताना त्यांना खूप काही शिकायला मिळाले. “देवरियाने मला योग्य गोष्टीच्या पाठीशी ठामपणे उभे राहायला शिकवले, तर मिर्झापूरने हे दाखवून दिले की ‘अशक्य’ अशी कोणतीच गोष्ट नसते. सर्वात मोठे समाधान मला तेव्हा मिळाले जेव्हा एखाद्या गरिबाला जमिनीचा हक्क मिळाला, दिव्यांग व्यक्तीला सन्मानाने जगता आले आणि शेतकऱ्याच्या शेताला पाणी पोहोचले,” असे त्यांनी नमूद केले.

    मिर्झापूरमधील लहुरिया दह या पहाडी गावात जेव्हा पहिल्यांदा पिण्याचे पाणी पोहोचले, तेव्हा एका वृद्ध महिलेने कांपत्या हातांनी आपल्या डोक्यावर ठेवलेला आशीर्वादाचा हात हा आयुष्यातील सर्वात मोठा क्षण होता, अशी आठवण त्यांनी व्यक्त केली. “आज माझे पद सुटले आहे, पण त्या वृद्ध माऊलीचा स्पर्श आणि या देशाच्या मातीने मला दिलेले स्वप्न मी कधीही सोडणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली

    September 6, 2026

    नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग

    September 6, 2026

    भयंकर! विषारी दारूमुळे ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू

    September 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif