वायुसेनेच्या अग्निवीर भरतीचा निकाल जाहीर; असा पहा निकाल

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

भारतीय वायू दलाने (IAF) अग्निपथ भर्ती योजना 2022 चा निकाल जाहीर (IAF Agniveer Result 2022) केला आहे. पहिल्या टप्प्यातील परीक्षेचा हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. याचे निकाल ऑनलाइन उपलब्ध आहेत. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट किंवा खाली दिलेल्या थेट लिंकवरून अग्निपथ निकाल 2022 पाहू शकतात.

अग्निपथ भरती योजना 2022 चा निकाल त्या सर्व उमेदवारांसाठी जाहीर करण्यात आला आहे. ज्यांनी 24 ते 30 जुलै 2022 दरम्यान फेज 1 परीक्षेत भाग घेतला होता. CASB अग्निवीर निकाल ऑनलाइन पाहण्यासाठी उमेदवारांना आता त्यांच्या लॉगिन क्रेडेंशियल्सची आवश्यकता असेल. स्कोअर डाउनलोड करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा, जाणून घ्या

असा पहा निकाल?

-उमेदवारांना भारतीय हवाई दल अग्निपथ भर्तीच्या http://agnipathvayu.cdac.in. या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

-मुख्यपृष्ठावरील ‘लॉगिन’ टॅबवर क्लिक करा आणि एक नवीन पेज उघडेल.

-आता लॉगिन करण्यासाठी तुमचा ईमेल आयडी,  पासवर्ड टाका  आणि कॅप्चा टाका.

-तुमचा निकाल 2022 तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

-भविष्यातील संदर्भासाठी त्याची एक प्रत डाउनलोड करा आणि प्रिंट आऊट घ्या

फेज 2 ऑनलाइन परीक्षेनंतर, निवडलेल्या सर्व उमेदवारांसाठी शारीरिक चाचणी आणि वैद्यकीय चाचणी देखील घेतली जाईल. या भरती मोहिमेद्वारे हवाई दलातील अग्निवीरच्या एकूण 3500 पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 24 जून 2022 पासून सुरू झाली आणि 5 जुलै 2022 पर्यंत चालली. यासाठी अर्ज करण्याची कमाल शैक्षणिक पात्रता विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण आहे. उमेदवाराचा जन्म 29 डिसेंबर 1999 ते 29 जून 2005 दरम्यान झालेला असावा. अग्निवीर भरती परीक्षेत निवडलेल्या अर्जदारांना PSL फेरीसाठी बोलावले जाईल. जी 01 डिसेंबर 2022 रोजी आयोजित केली जाणार आहे.

IAF अग्निवीर भर्ती 2022 साठी 7 लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले. CASB निकालाच्या घोषणेनंतर, उमेदवारांनी पुढील फेरीसाठी तयारी करणे आवश्यक आहे. IAF मध्ये अग्निवीरांची अंतिम नावनोंदणी 11 डिसेंबर 2022 पासून सुरू होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.