Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    • प्रेमसंबंधाचा विरोध ठरला जीवघेणा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»राजकारण»कोणाच्याही ताटातील कोणालाही देणार नाही!
    राजकारण

    कोणाच्याही ताटातील कोणालाही देणार नाही!

    मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया आली समोर
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 10, 2026No Comments94 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच तापला आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांच्या उपोषणाचा आज 13 वा दिवस आहे. दरम्यान येत्या 12 सप्टेंबरनंतर आम्ही मुंबईत येणार असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या या इशाऱ्यानंतर आता सरकारचं टेन्शन वाढलं आहे. जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावं, यासाठी सरकार दरबारी हालचालींना वेग आला आहे. यावर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया समोर आली आहे, ते नंदुरबारमध्ये बोलत होते.

    मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी आम्ही कुठेही कमी पडत नाही आहोत.  ही जी आम्ही मेहनत घेत आहोत, ती मार्ग काढण्यासाठीच घेत आहोत. आम्ही मराठा समाजाच्या न्याय हक्काच्या मागण्या पूर्ण करत आहोत. मात्र हे करत असताना कोणाच्याही ताटातील कोणालाही देणार नाही. ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय होणार नाही, याची दक्षता महायुती सरकार घेत आहे, असं यावेळी सामंत यांनी म्हटलं आहे. दरम्यान सध्या दिले जाणारे प्रमाणपत्र कुठेही ओबीसीच्या वाट्याचे दिले जात नाहीये. निजामाची सत्ता असताना ज्या नोंदी मराठा कुणबी मिळाल्या नव्हत्या, त्या शिंदे समितीने शोधून काढल्या आणि त्यांना आपण प्रमाणपत्र देत आहोत, असंही ते यावेळी म्हणाले.

    मनोज जरांगे पाटील हे मुंबईमध्ये येणार आहेत, त्यांनी आरक्षणावर मार्ग न निघाल्यास येत्या 12 सप्टेंबरनंतर मुंबईत येण्याचा इशारा दिला आहे, यावर देखील उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 12 सप्टेंबर कशाला, त्याच्या अगोदरच आम्ही मनोज जरांगे पाटील यांचं उपोष थाबंवण्याचा प्रयत्न करू. आम्ही शासनाच्या वतीने विनंती करतो की, जरांगेंनी उपोषण थांबवावे. राज्यात गणेशोत्सव आणि इतर सण-उत्सवात नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी आंदोलनकर्त्यांनी आणि मनोज दादांनी काळजी घेतली पाहिजे, हीच आमची भूमिका आहे, असं यावेळी उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!

    October 6, 2026

    अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात

    October 6, 2026

    वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द

    October 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif