Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची? निकाल अंतिम टप्प्यात!
    • हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप
    • बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून
    • चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल
    • मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस
    • गणेशोत्सवाच्या धामधुमीत किरकोळ वादातून गोळीबार!
    • बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!
    • जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»“मी मराठी बोलतो, मला मराठी समजते, माझ्या रिक्षात बसा!”
    महाराष्ट्र

    “मी मराठी बोलतो, मला मराठी समजते, माझ्या रिक्षात बसा!”

    पण “मराठी येत नसेल तर बॅग भरून निघून जा!” : मनसे आक्रमक
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 27, 2026No Comments130 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    महाराष्ट्रामध्ये रिक्षाचालक, टॅक्सीचालकांना तसेच ओला आणि उबेर चालकांना मराठी बोलणं सक्तीचं करण्यात आलं आहे. येत्या 1 मे पासून मराठी भाषेचा वापर बंधनकारक करण्यात आला असून शिवसेना एकनाथ शिंदेंच्या पक्षाचे नेते, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे मराठी सक्तीच्या मुद्द्यावर आडून बसले आहेत. तर शिंदे गटाचेच माजी खासदार संजय निरुपम यांनी या निर्णयाला कडाडून विरोध केल्याने राज्यात वाद पेटला आहे. मराठी सक्तीच्या या मुद्यावरून मनसेनेही आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले आहे.

    मराठी भाषा आणि स्थानिक अस्मितेच्या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. मराठी सक्तीच्या निर्णयाच्या विरोधात 4 मे रोजी परप्रांतीय रिक्षाचालकांनी संप पुकारला असून, त्याच पार्श्वभूमीवर, मनसेने डोंबिवलीत जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘मी मराठी बोलतो, मला मराठी समजते’ असे स्टिकर्स आता रिक्षांवर झळकू लागले असून, मनसे कार्यकर्त्यानंतर आता खुद्द मनसेचे नगरसेवक या मोहिमेसाठी रस्त्यावर उतरले आहेत. यामुळे परप्रांतियांचं मात्र धाबं दणाणलं आहे.

    मराठी भाषेच्या मुद्द्यावरून कल्याण-डोंबिवलीत मनसे आणि परप्रांतीय रिक्षाचालक यांच्यातील वाद आता अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कल्याण ग्रामीणनंतर आता डोंबिवली शहरातही मनसेने आपली ‘मराठी स्टिकर मोहीम’ तीव्र केली आहे. विशेष म्हणजे, या मोहिमेत आता मनसेचे आजी-माजी नगरसेवकही प्रत्यक्ष सहभागी झाले आहेत.

    डोंबिवली पश्चिमेतील रेल्वे स्टेशन परिसरात मनसेचे नगरसेवक संदेश पाटील आणि नगरसेविका रसिका संदेश पाटील यांनी कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरून रिक्षांना स्टिकर्स लावले. “मी मराठी बोलतो, मला मराठी समजते, माझ्या रिक्षात बसा,” अशा मजकुराचे हे स्टिकर्स रिक्षांच्या दर्शनी भागावर चिटकवण्यात आले आहेत. यावेळी “मराठी येत नसेल तर बॅग भरून निघून जा,” अशा घोषणा देत मनसे कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.

    मराठी सक्तीच्या निर्णयाच्या विरोधात, काही परप्रांतीय रिक्षा संघटनांनी येत्या 4 मे रोजी संप पुकारण्याचा इशारा दिला आहे. मात्र यावर नगरसेवक संदेश पाटील यांनी कडक शब्दांत इशारा दिला आहे. “महाराष्ट्रात राहून मराठी भाषेला विरोध करणाऱ्यांचा संप आम्ही एकजुटीने हाणून पाडू. ज्यांना मराठी बोलण्याची लाज वाटते किंवा अडचण आहे, त्यांनी खुशाल गावी जावे. राज्य सरकारने या बेकायदेशीर संपावर कठोर कारवाई करावी, अन्यथा मनसे आपल्या शैलीत उत्तर देईल” अस त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे येत्या 4 तारखेला मनसे नेमकी काय भूमिका घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप

    September 16, 2026

    बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून

    September 16, 2026

    चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल

    September 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif