creative bridal shower gifts from the maid of honor herbert automotive coupons canton ga dotster coupon 2013 dragon ball z gift basket cocco's pizza springfield coupons
Monday, December 5, 2022

धक्कादायक; दोन दिवसांपूर्वी गर्भवती पत्नीचा अपघाती मृत्यू… पतीने उचलले टोकाचे पाऊल…

- Advertisement -

 

- Advertisement -

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क:

- Advertisement -

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी आपल्या गर्भवती पत्नीच्या झालेल्या अपघाती निधनाने नैराश्यात गेलेल्या पतीने विषारी औषध प्राशन करत आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना जुन्नर तालुक्यातील धोंडकरवाडी येथे घडली आहे. रमेश नवनाथ कानसकर असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. या घटनेने संपूर्ण जुन्नर तालुका हळहळला आहे.

रमेश कानसकर हे आपल्या गर्भवती पत्नीला नारायणगाव येथे दोन दिवसापूर्वी चेकअपसाठी घेऊन गेले होते. रुग्णालयातून परतत असतानाच डंपरखाली चिरडून पत्नीचा जागीच मृत्यू झाला होता. आपल्या पत्नीचा डोळ्यासमोर झालेला मृत्यू पतीच्या जिव्हारी लागला. यानंतर पतीने विषारी औषध घेऊन स्वतःची जीवनयात्रा संपवली.

विद्या आणि रमेश यांचा अवघ्या आठ महिन्यांपूर्वीच जुन्नर येथे विवाह झाला होता. यानंतर ती चार महिन्यांची गर्भवती होती. त्यामुळे तिची डॉक्टरकडे तपासणी सुरू होती. 14 नोव्हेंबरला रमेश आपली पत्नी आणि सासूला दुचाकीवरून घेऊन डॉक्टरांकडे तपासणी करून घरी जात होता. वारुळवाडी येथे येताच ऊस घेऊन येणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा धक्का दुचाकीला लागला. यामुळे विद्या खाली पडली तिच्या डोक्यावरून ट्रॉलीचे चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला होता.

या घटनेमुळे रमेश हा नैराश्यात गेला होता. आणि त्यामुळे त्याने मागच्या दोन दिवसांपासून अन्न आणि पाणी देखील सोडले होते. त्याने बुधवारी रात्रीच्या सुमारास विषारी औषध घेऊन स्वतःला संपवले.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या